- अमर घटारे / अक्षय बडवे
अमरावती जिल्ह्यात पुन्हा 5 नवीन कोरोना (corona) पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्व रुग्ण अमरावती शहरातील आहेत. त्यांच्यावर जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मास्कचा वापर सर्वांनी केला पाहिजे, आम्ही देखील मास्क घातला पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. महाराष्ट्र राज्यात देखील काेराेनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. राज्यातील आराेग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, गर्दी करु नये असे आवाहन प्रशासन करीत आहे.
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत या महिन्यात 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (covid cases in amravati) नोंद झाली आहे. अमरावतीत दररोज 60 ते 70 नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात येते. त्यानंतर अहवाल प्राप्त हाेताे. त्यातून सुमारे एक, दाेन नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याची माहिती प्राप्त हाेते.
मास्क वापरलाचा पाहिजे : अजित पवार
राज्यात काेराेनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सरकराकडून खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले. मागच्या वेळेस सगळ्यांनी कर्तव्य बजावत सहकार्य केले होते. आता जो काेराेना (जेएन.1, Corona JN.1) आहे त्यात तीव्रता फार नाही अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान मास्क वापरायला आम्ही अजून सुरुवात केली नाही, पण आम्ही पण वापरला पाहिजे ते पण सत्य आहे. मुख्यमंत्री आणि इतर सगळे याबाबत निर्णय घेऊ असेही पवार यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.