- सचिन जाधव
मालवाहतूकदारांच्या आंदोलनानंतर आता राज्यातील एसटी कामगार संघटना (maharashtra st kamgar sanghtna) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. वर्ष झाले तरी अद्याप मान्य मागण्यांची पुर्तता न झाल्याने एसटी संघटनेने येत्या १३ फेब्रुवारीपासून राज्यात विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे आज (गुरुवार) जाहीर केले. (Maharashtra News)
एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे म्हणाले गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर मागण्या होऊनही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्या विरोधात आता आम्ही एल्गार पुकारणार आहाेत. एसटी संघटना आक्रमक झाल्याचे पाहून सरकारला जागं येईल असेही पदाधिका-यांनी नमूद केले.
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात राज्य सरकार सोबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची बैठक झाली होती. त्या कामगार करारत सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढीचा दर कामगारांना देण्याची सरकारने मान्य केले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यानुसार मागील महागाई भत्तेची घरभाडे भत्ता थकबाकी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन देण्याची मागणी केली होती. तरीही त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यामुळे आता येत्या १३ फेब्रुवारीपासून राज्यात विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण सुरू करण्यात असल्याचे एसटी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.