Pune News Saam
मुंबई/पुणे

Pune Crime: आईच्या अफेअरचं पितळ लेकीनं उघडं पाडलं, मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून बॉयफ्रेंड अन् नातेवाइकांना पाठवले; पुण्यात खळबळ

Mother Accused of Sharing Daughters Private Videos: आईनेच अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून केले व्हायरल. आई आणि तिच्या प्रियकराला पोलिसांकडून अटक.

Bhagyashree Kamble

आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यातून समोर येत आहे. एका आईनं पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोटच्या लेकीचे अश्लील व्हिडिओ काढत नराधम आईनेच ते स्वतःच्या प्रियकराला आणि नातेवाईकांना पाठवले. पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी नराधम आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

भारती विकास कुऱ्हाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांचे अनैतिक संबंध आहे. भारती विकास कुऱ्हाडे मुळची सासवडमधील रहिवासी. मात्र, कौटुंबिक कलहामुळे ती बिबवेवाडीत आपल्या मुलीसोबत राहायला आली. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागली. तिचं पेट्रोल पंपावरील एका मुलासोबत प्रेमप्रकरण जुळलं. त्याचं महिलेच्या घरी येणं जाणं सुरू होतं. ही बाब महिलेच्या मुलीला काही पटली नाही.

तिने थेट घरमालकाला जाऊन आई आणि तिच्या प्रियकराची तक्रार दिली. नंतर रागाच्या भरात आईने मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो शूट करून नातेवाईकांना पाठवले. तसेच तिच्या प्रियकरालाही पाठवले. त्यानंतर मुलीने पोलीस ठाणे गाठत आई आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोघे फरार झाले. सोलापूर, कोल्हापुरात आपले अस्तित्व लपवून राहत होते.

दरम्यान, २ दिवसांपूर्वी पोलिसांना आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळाली. खडकवासलामध्ये पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींना ताब्यात घेतलं. या प्रकरणी २६ तारखेपर्यंत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT