Moshi garbage depot collapse  saam tv
मुंबई/पुणे

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई, ९ जणांच्या मृत्यूला जबाबदार; २ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Moshi garbage depot collapse update: मोशी कचरा डेपोतील इमारत कोसळल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी २ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More
  • मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट

  • मोशी इमारत दुर्घटनेमध्ये ९ कामगारांचा मृत्यू

  • भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून कारवाई

  • कंपनीच्या २ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेमध्ये ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या सर्वांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कंपनीविरोधात आणि सुरक्षा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून ही दुर्घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचा प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पिंपरी- चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णीना अभय दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. पिंपरी-चिंचवडच्या मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेप्रकरणी अखेर महापालिकेकडून भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सुरक्षा अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५,१२५(ए), १२५(बी), ३(५)या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगराचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. कचऱ्याच्या डोंगराचा काही भाग कोसळल्यामुळे इमारत कोसळली होती.

ढिगाऱ्याखाली २३ जण अडकले होते. यामधील १४ जणांची सुखरूप सुटका करणय्यात आली होती. तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अकडले होते. ३ दिवस चाललेल्या बचाव कार्यामध्ये अनेकांचे प्राण वाचवण्यात आले. या दुर्घटनेमध्ये ९ कामगारांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते. आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack: हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? सोप्या शब्दांत समजून घ्या

Maharashtra News Live Update: जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, एनएसयूआयने 'विद्यार्थी न्याय मोर्चा' काढला

गावरान टाकळा भाजी कशी ओळखायची?

'त्या' दोघांनाही सोडले जाणार नाही; जंतर-मंतर आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा

Pune Crime: पुणे हादरले! अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी रक्तरंजित थरार, मिरवणुकीत टोळक्याने तरुणाला संपवलं

SCROLL FOR NEXT