तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

Nanded Police Seize Pakistani Cosmetics: गोरे होण्यासाठी कुणाची धडपड नसते.अनेकजण त्यासाठी नाना प्रकारच्या क्रिमचा वापर करतात. मात्र जरा सावधान कारण...कदाचीत तुम्ही वापरत असलेल्या क्रीममध्ये आरोग्याला घातक विषारी घटक असू शकतात. कुठे झाली आहे याची विक्री ?कोणत्या ब्रॅण्डची ही सौंदर्य प्रसाधने आहेत ? पाहूया एक खास रिपोर्ट...
Parley 24K Gold Gleam Beauty Cream mercury report
Parley 24K Gold Gleam Beauty Cream mercury reportsaam tv
Published On: 

नाव पाहिलंत...गोरी ब्युटी क्रीम, सॅण्डल एक्स्ट्रा ब्राईटनिंग, गोल्ड शाईन, अशी नावे पाहून अनेकांना भूरळ पडली नाही तर नवल... कारण गोरे होण्यासाठी अनेकांची धडपड असते. नाना प्रकारच्या क्रिमचा अनेकजण वापर करतात. पण सावधान तुम्ही पाहात असलेली ही उत्पादने पाकिस्तानची आहेत. गंभीर बाब म्हणजे या सौंदर्य प्रसाधनांमध्ये विषारी घटक असल्याचं निष्पन्न झालंय. नांदेड पोलिसांनी 39 लाख 69 हजार रुपयांचा पाक उत्पादनांचा साठा जप्त केला. त्याचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल समोर आल्यावर विषारी घटकांचं धक्कादायक प्रमाण समोर आलंय.

शहरातल्या अफराह कलेक्शन या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला होता.या दुकानातून 'मेड इन पाकिस्तान' असा उल्लेख असलेला सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला होता. आरोपी मोहम्मद जियाउद्दीन मोहम्मद वाजीद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नियमांनुसार सौंदर्य

प्रसाधनात पाऱ्याचे म्हणजेच मर्क्युरीचं प्रमाण जास्तीत जास्त 1 PPM ( पार्ट पर

मिलेनिअम) असावे. मात्र पाकिस्तानच्या PARLEY 24K GOLD GLEAM BEAUTY CREAM मध्ये

पाऱ्याचे प्रमाण 48,453.44 PPM म्हणजे मर्यादेपेक्षा 48 हजार पटीने जास्त आढळले.

तर GOREE BEAUTY CREAM WITH LYCOPENE मध्ये पाऱ्याचे प्रमाण 6,924.94 PPM म्हणजे

मर्यादेपेक्षा सुमारे 7 हजार पटीने जास्त आढळले.

पारा आणि आर्सेनिक त्वचेद्वारे शरीरात शोषला जाऊन किडनी निकामी होणे,किंवा मज्जासंस्थेवर घातक परिणाम होऊ शकतो.यापूर्वी वर्षभरात मुंबईसह पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धुळे,

सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 'मेड इन पाकिस्तान' लेबल असलेल्या सौंदर्य प्रसाधनांची बेकायदा विक्री आणि साठवणूक झाल्याचे उघड झालं होतं..तर जूनमध्ये चिंचवडमध्ये एका यात्रेत पाकिस्तानचं लेबल असलेल्या चादरीची विक्री झाली होती.. बंदी असतानाही शत्रू राष्ट्राची उत्पादनांची महाराष्ट्रात सर्रास विक्री होणे ही गंभीर बाब आहे. आरोग्याला घातक असलेल्या या उत्पादनांची घुसखोरी होतेच कशी याची पाळमुळं खणून काढण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.