Maharashtra Weather Alert  Saam TV news
मुंबई/पुणे

Heavy rainfall : मुंबई-पुणेकरांनो सावधान, पुढचे ४ तास पाऊस धो धो बरसणार

Heavy rainfall in Pune and Mumbai Thane : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra pre-monsoon rain alert : केरळमध्ये शनिवारी मान्सून धडकला अन् महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला. पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबई आणि पुण्यामध्ये कोसळधारा सुरू आहे. मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. तर पुणे आणि घाटमाथ्यावर पावसाचा धुमाकूळ आहे. पुढील तीन ते चार तास महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह धो धो पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि सिंधुदुर्ग येथे पुढील ३-४ तासांत (दुपारी २:२० पर्यंत) काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने (IMD मुंबई) जाहीर केले आहे. रायगडमध्ये काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आहे. काही भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांना बाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि इतर भागांतील रहिवाशांनी पावसाळी परिस्थितीमुळे सतर्क राहावे.

मुंबई आणि उपनगरात मागील काही दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. अंधेरी, पवई, भांडूप, दादर आणि कुर्ला परिसरात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सांताक्रूझ वेधशाळेत २७ मिमी पावसाची नोंद झाली. पवईत झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारी २:२० पर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये तीव्र पावसाची शक्यता आहे. वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. नागरिकांना बाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून, वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गणपती विसर्जनाला रेकॉर्ड, ३१ तासांपासून मिरवणूक सुरूच

Stomach Cancer : वजन कमी, पोट दुखी जळजळ आणि अस्वस्थता जाणवतेय? स्टेज 1 कॅन्सरची हेच तर लक्षण नाही? जाणून घ्या

आईला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवताना पाहिलं; मुलीचा गळा आवळून विहिरीत फेकलं, कलयुगी आईचा प्रताप

Virar Building Collapse: विरारमध्ये 40 वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला अन् पुढे काय घडल? VIDEO

Dhule Accident : भीषण अपघात; ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने ट्रक अनियंत्रित, दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT