Lalbaugcha Raja Saam tv
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या मिरवणुकीत चोरांनी केले हात साफ, १०० जणांचे मोबाइल- सोनसाखळी चोरीला

Mumbai Police: मुंबईमध्ये लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळला. चोरट्यांनी १०० पेक्षा अधिक मोबाईल आणि सोनसाखळ्या चोरल्या. या प्रकरणी पोलिल ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.

Priya More

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही गणेश भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. ही मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक सहभागी होत असतात. लालबाग ते गिरगाव चौपाटीपर्यंत लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक असते. यावर्षी लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक जवळपास ३२ ते ३५ तास चालली. या मिरवणुकीमध्ये लाखोंपेक्षा जास्त गणेशभक्त सहभागी झाले होते. या गर्दीमध्ये चोरांनी हात साफ केले.चोरट्यांनी भाविकांचे मोबाइल आणि सोनसाखळ्या चोरी केल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोबाइल चोरीच्या १०० पेक्षा अधिक घटना घडल्या. काळाचौकी पोलिस ठाण्याबाहेर तक्रार दाखल करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. आतापर्यंत १० जणांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या गेल्या आहेत. त्यामधील चोरी झालेले ४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी चोघांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल चोरीसोबत सोनसाखळ्यांची देखील चोरी झाली आहे. या प्रकरणी ७ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दोन सोन्याच्या साखळी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी १२ जणांना अटक केली आहे. मुंबईच्या भोईवाडा पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून अनेक गुन्हे देखील दाखल केले आहेत. यावर्षी विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला.

दरम्यान, गणपती विसर्जनाला गालबोट लागले. गणपती विसर्जनादरम्यान घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. गणपती विसर्जन करत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यामधील अनेकांचा मृत्यू झाला. तर काही जण वाहून गेले आहेत. ते अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT