Shreya Maskar
वजन कमी करण्यासाठी धूम्रपान, मद्यपान सोडा. तसेच तेलकट पदार्थ, जंक फूड खाऊ नका. पॅक बंद पदार्थ टाळा. पदार्थाच्या प्रमाणापेक्षा त्याच्या पोषण मुल्यांवर लक्ष द्या.
तुमचे शरीर दररोज जेवढ्या कॅलरी वापरते, त्यापेक्षा किंचित कमी कॅलरींचे सेवन करा. तुमच्या शरीराच्या आकारानुसार आणि शारीरिक हालचालींच्या पातळीनुसार कॅलरींचे संतुलित सेवन करा.
तुमच्या ताटात कमी चरबीयुक्त प्रथिने (चिकन, मासे, कडधान्ये), भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश करा. सोडा आणि गोड पदार्थांचे सेवन बंद करा.
दररोज २ ते ३ लिटर पाणी प्या आणि पोट भरल्यासारखे वाटण्यासाठी जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्या.शरीरात कोणतेही बदल पटकन जाणवत नाही, त्यासाठी सातत्य ठेवावे लागते. लहान, दैनंदिन सुधारणांवर लक्ष केंद्रित करा.
अतिरिक्त कॅलरी जाळण्यासाठी आठवड्यातून ३ ते ५ वेळा २० ते ३० मिनिटे कार्डिओ व्यायाम करा. जसे की जलद चालणे, जॉगिंग किंवा सायकलिंग. स्नायू बळकट करण्यासाठी आणि चयापचय क्रिया सुधारण्यासाठी आठवड्यातून ३ वेळा स्क्वॅट्स, पुश-अप्स आणि प्लँक्ससारखे बॉडीवेट व्यायाम करा.
आठवड्यातून किमान एक किंवा दोन दिवस हलके स्ट्रेचिंग, योगा किंवा साध्या विश्रांतीसाठी वेळ काढा. तुम्ही गवतात चालायला जा.
तुमची चयापचय क्रिया आणि रिकव्हरीला मदत करण्यासाठी दररोज रात्री ७ ते ८ तास दर्जेदार झोप घेण्याचे ध्येय ठेवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.