Shreya Maskar
वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नाही. निरोगी आहार आणि चालण्यामुळे वेगाने वजन कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी, तुमच्या नाश्त्यामध्ये व्हेजिटेबल दलिया (Vegetable Daliya) या पदार्थाचा समावेश करा.
नाश्त्यामध्ये व्हेजिटेबल दलिया खाण्यासोबतच चालणे आणि इतर व्यायाम केल्यास वेगाने वजन कमी झाल्याचे दिसून येईल. वजन कमी करण्यासाठी, एक महिना नियमितपणे व्हेजिटेबल दलिया खा.
व्हेजिटेबल दलिया बनवण्यासाठी सर्वप्रथम जवची (गव्हाच्या दलियाची) लापशी तेल किंवा तुपाशिवाय कोरडी भाजून घ्या.
१ वाटी व्हेजिटेबल दलिया बनवण्यासाठी, अर्ध्या वाटीपेक्षा कमी लापशी घ्या आणि थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवा आणि लापशीसाठी लागणाऱ्या भाज्या चिरून घ्या.
कुकरमध्ये १ थेंब तेल घालून त्यात जिरे , कांदा, लसूण, घेवडा, कोबी, गाजर, हिरवे वाटाणे, बटाटे, टोमॅटो, मका, ढोबळी मिरची किंवा इतर कोणत्याही भाज्या घालून ५ मिनिटे शिजवा.
त्यानंतर थोडी हळद आणि मीठ घाला. हिरव्या मिरच्या घाला आणि भिजवलेली लापशी घालून तांदळाच्या प्रमाणात पाणी घाला. तुम्ही दीड वाटी पाणी घालू शकता. शेवटी व्हेजिटेबल दलिया मध्यम आचेवर ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. पदार्थ थंड झाल्यावर वरून हिरवी कोथिंबीर घाला आणि लिंबू पिळा.
व्हेजिटेबल दलियामध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तसेच शरीराला व्हिटॅमिन बी१२ देखील मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.