High BP - Weight Loss : सकाळची 'ही' १ साधी सवय हाय बीपी अन् वाढणारे वजन ठेवेल कंट्रोलमध्ये, आतापासून करा फॉलो

Shreya Maskar

सकाळची सवय

सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी पिणे तुमच्या शरीराला अनेक फायदे देऊन जाते. हाई ब्लड प्रेशर, पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी गरम पाणी खूपच फायदेशीर ठरते.

morning habit | pinterest

उच्च रक्तदाब

तुम्हाला नियमित उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर हे पाणी प्या. कोमट पेयामुळे रक्तवाहिन्या रुंद होण्यास मदत होते. यामुळे स्नायू आणि अवयवांपर्यंत रक्तप्रवाह सुरळीतपणे होतो.

High blood pressure | pinterest

वजन नियंत्रण

गरम पाण्यामुळे शरीराचे तापमान थोडे वाढते. यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने जाळण्यास मदत होते. व्यायाम केल्यावरही तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता.

Weight control | pinterest

पचन सुधारते

रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल सुधारते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो. कोमट पाण्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि दिवसभरात अन्नाचे पचन सहज होण्यास मदत मिळते.

Improves digestion | pinterest

पावसाळी आजार दूर

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात कफ, सर्दी, खोकला यांच्या समस्या उद्भवतात. गरम पाण्यामुळे वाफ आणि उष्णतेमुळे कफ पातळ होतो. यामुळे बंद नाक किंवा घशातील खवखव दूर होण्यास मदत होते.

Monsoon disease away | pinterest

तणाव कमी

गरम पाण्यामुळे मज्जासंस्थेला शांतता मिळते. यामुळे चिंता कमी होण्यास आणि सकाळी ताठरलेले स्नायू शिथिल होण्यास मदत होते.

Less stress | pinterest

पाणी पिण्याची योग्य पद्धत

रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्या. तुम्ही यात मध देखील टाकू शकता. मात्र सहसा नुसते पाणी पिणेच खूप फायदेशीर ठरते.

Proper method of drinking water | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

hot water | pinterest

NEXT : औषधी गुणांनी समृद्ध 'या' फळाचं पान रोज खा, मधुमेह अन् हाय बीपी कायम राहील नियंत्रणात

High BP - Diabetes | AI PHOTO
येथे क्लिक करा...