Saam Tv
भाज्या, कांदा, लसूण आणि मसाल्याचे कापताना लाकडी चॉपिंग बोर्डमध्ये वास आणि ओलावा राहू शकतो. त्यामुळे बोर्ड वेळोवेळी डीप क्लीन करणं गरजेच आहे. काही सोप्या उपायांनी बोर्ड स्वच्छ करता येतो.
बोर्डवर अडकलेले भाज्यांचे तुकडे काढून टाका. त्यानंतर कोमट पाणी आणि थोड्या सौम्य डिश सोपच्या मदतीने दोन्ही बाजू स्वच्छ करा.
बोर्डवर मीठ पसरवा. त्यानंतर लिंबाने संपूर्ण बोर्ड हलक्या हाताने घासा. कांदा, लसूण किंवा मसाले कापलेल्या भागांवर लावा. काही मिनिटांनी स्वच्छ धुवा.
बोर्डवरची दुर्गंधी सहज जात नसेल तर बेकिंग सोडा वापरू शकता. बेकिंग सोड्यामध्ये थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि त्याने बोर्ड स्वच्छ करा.
लाकडी बोर्ड धुतल्यानंतर तो ओला ठेवू नका. स्वच्छ कपड्याने पुसून हवेशीर ठिकाणी ठेवा. बोर्डच्या दोन्ही बाजू व्यवस्थित कोरड्या होऊ द्या. कारणा ओलावा राहिल्याने दुर्गंधी येते.
चॉपिंग बोर्ड वापरल्यानंतर लगेच स्वच्छ करा. त्यामुळे कांदा आणि लसणा सारखे स्ट्राँग वास चिकटून राहत नाही.
एकापेक्षा खूप जास्त चिरा जर बोर्डवर पडल्या असतील तर त्या वेळीच बदला. कारण चिरा पडलेल्या बोर्डातील कण जेवणात मिसळू शकतात.
लाकडी चॉपिंग बोर्ड बराच वेळ पाण्यात भिजवून ठेवू नका. यामुळे लाकडात जास्त वेळ ओलावा राहतो. त्यामुळे बोर्ड लवकर खराब होतो.