Raj Thackeray Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: 'कायदे आहेत, पण ऑर्डर नाहीत, मुंबई पोलिसांना ४८ तास द्या...' गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंचा व्हिडिओ मनसेकडून ट्वीट

Raj Thackeray Video On Mumbai Police: राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या, असा कॅप्शनही देण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Raj Thackeray News:

दहिसरमध्ये काल रात्री शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भयंकर घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

काय आहे राज ठाकरेंचा व्हिडिओ..?

"आपल्या देशात कायदे आहेत. लॉ आहेत पण ऑर्डर्स नाहीत. माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. १०० टक्के विश्वास आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांच्या हातात ४८ तास द्या, त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करुन द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. फक्त ऑर्डर्स नसतात. पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्यांना जर जेलमध्ये जावं लागतं असेल, का जातील ते जेलमध्ये?"

"वर बसलेला माणूस टेंपररी आहे. त्याच्यासाठी परमनंट जेलमध्ये जायचं, ह्याला काय अर्थ आहे का? आपल्याकडे उत्तम कार्य करणारे पोलीस अधिकारी आहेत. महाराष्ट्र त्याबाबतीत भाग्यवान आहे. त्यांना फक्त ४८ तास मोकळा हात द्या," असा पुनरुच्चार राज ठाकरे (Raj Thackeray) या व्हिडिओमध्ये करताना दिसत आहेत.

दरम्यान, मनसे अधिकृत या सोशल मीडिया पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या या या व्हिडिओसोबत राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या, असा कॅप्शनही देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT