Konkan Politics: राज ठाकरे यांनी कोकणातील माजी आमदाराची पक्षातून केली हकालपट्टी, नेमकं कारण काय?

Raj Thackeray News: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील माजी आमदार परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam Tv
Published On

>> आवेश तांदळे

Konkan Politics:

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील माजी आमदार परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्यासोबतच प्रवीण मर्गज यांनाही पक्षातून बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला आहे.

मनसेने याबाबत एक प्रसिद्धी पत्रकही जाहीर केलं आहे. ''यात सांगण्यात आलं आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध असणार नाही. याची तमाम महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी.'', असं या पत्रकात लिहिलं आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raj Thackeray
Lok Sabha Election: मोठी बातमी! ठाकरे गटाचा महाराष्ट्रात लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला

का करण्यात आली हकालपट्टी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम उपरकर हे मागील कित्येक महिन्यांपासून पक्षासोबत संपर्क ठेवत नव्हते. मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी पक्षाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थिती दर्शवली नाही. परशुराम उपरकर यांनी यापूर्वीच पक्षाला राजीनामा दिला असल्याचे देखील सांगितले जात आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी सांगितलं की, पक्षाने आखून दिलेल्या शिस्तीचे पालन न केल्याचा ठपका ठेवत आज परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी केली. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक जारी करून केली हकालपट्टी केली आहे.

Raj Thackeray
Sharad Pawar News : शरद पवारांनी दंड थोपटले; राज्यव्यापी दौरा करण्याची शक्यता, १५ फेब्रुवारीला बारामतीतून सुरुवात

परशुराम उपरकर यांनी काय दिली प्रतिक्रिया?

पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर परशुराम उपरकर यांनी याबाबत आपलॆ प्रतिकिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''माझी पक्षातून हकालपट्टी झाली अशा बातम्या येत आहेत, त्या चुकीच्या असून मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मी दीड वर्षापासून पक्षात सक्रिय नव्हतो. पक्षात जे काही चाललं होतं, त्याबद्दल मी नाराज होतो.'' उपरकर यांच्या राजीनाम्यावरून राजकारण सुरू झालं आहे. पक्षातून त्यांची हकलपट्टी करण्यात आली असं पक्षाचे म्हणणं आहे. तर मी राजीनामा दिला असं उपरकरांचे म्हणणे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com