Sharad Pawar News : शरद पवारांनी दंड थोपटले; राज्यव्यापी दौरा करण्याची शक्यता, १५ फेब्रुवारीला बारामतीतून सुरुवात

NCP Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत. शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीतून आल्यानंतर पुढच्या आठवड्यात शरद पवार नव्या जोमाने कामाला लागणार आहेत.
Sharad Pawar Party Name
Sharad Pawar Party NameSaam Digital
Published On

Pune News :

पक्ष गेला... चिन्ह गेलं... वयाच्या ८४ व्या वर्षी शरद पवारांवर (Sharad Pawar) मोठं राजकीय संकट ओढावलंय. एवढा मोठा आघात झाला तर एखादी व्यक्ती खचून जाईल. मात्र रडायचं नाही तर लढायचं, या वृत्तीने शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. सगळं काही हातून गेलं असताना, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुन्हा दंड थोपटले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत. शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीतून आल्यानंतर पुढच्या आठवड्यात शरद पवार नव्या जोमाने कामाला लागणार आहेत. पक्ष आणि चिन्ह गेल्यानतंर शरद पवार लोकांमध्ये जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यासाठी शरद पवार राज्यव्यापी दौरा करण्याची शक्यता आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar Party Name
Lok Sabha Election: मोठी बातमी! ठाकरे गटाचा महाराष्ट्रात लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला

पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीतून शरद पवार आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे. येत्या १५ ,१६ आणि १७ तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार दौरा करणार आहे.

त्यानंतर १८ तारखेला पवारांचा पुरंदर दौरा असणार आहे. तर २१ फेब्रुवारीला आंबेगाव येथे दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात दौरा असणार आहे.

Sharad Pawar Party Name
Maharashtra Politics : कन्फर्म ! बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार, तारीख आणि ठिकाण ठरलं!

पक्ष आणि चिन्ह गेले तरी जनता आपल्यासोबत आहे असं शरद पवार गटाचे नेते सांगत आहे. घड्याळ हातून गेले असलं तरी मनगट आमच्याकडे आहे. लढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

तर जखमी वाघ अधिक धोकादायक असतो, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. अशा स्थितीत शरद पवार हे 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' पक्षाचा आश्वासक चेहरा आहेत. त्यांच्या मार्फत पक्षाचं नवीन नाव आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे शरद पवारांचा हा मास्टरप्लान किती यशस्वी होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com