एसटी कर्मचाऱ्यांना मनसेची साथ! संपात मनसेही होणार सहभागी...
एसटी कर्मचाऱ्यांना मनसेची साथ! संपात मनसेही होणार सहभागी... Saam Tv
मुंबई/पुणे

एसटी कर्मचाऱ्यांना मनसेची साथ! संपात मनसेही होणार सहभागी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यभरात अनेक ठिकाण राज्य परिवहन विभाग अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अनेक ठिकाणी एसटी आगार पुर्णतः बंद आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाली आहे. मनसेने या संपाला पाठिंबा देत या संपात मनसे कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत. (MNS supports ST employees! MNS will also participate in the strike)

हे देखील पहा -

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे, वेळेवर पगार मिळणे, पगारवाढ मिळणे, त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची घोषणा केली होती. ऐन दिवाळीच राज्यातील अनेक बस आगार बंद होते. राज्य सरकारने संपात सहभागी होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील केली होती. मात्र तरीही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून आजही राज्यातले अनेक बस आगारं बंद आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात आता मनसे देखील सहभागी होणार आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी परिपत्रक काढत याची माहिती दिली आणि मनसैनिकांना संपात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

काही दिवसांपुर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष देण्याची विनंती केली होती. मात्र कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने मनसे आज थेट संपात सहभागी झाली आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक झाला आहे, असं म्हणत मनसे या संपात सामील झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

Today's Marathi News Live : उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Jat Drought Area : पाण्याचे स्त्रोत आटले; 2 दिवसांत म्हैसाळ सिंचनातून तलाव, विहिरी भरणार : जत प्रांताधिकारी

SCROLL FOR NEXT