...तर ३१ जणांचे प्राण वाचले असते!

आम्ही लोकशाही मार्गाने आंदेलन करणाऱ्या एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी आहोत असे आमदार गाेपीचंद पडळकर यांनी नमूद केले.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar

सांगली : आर्यन खानची सुटका व्हावी यासाठी मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक आणि गृहमंत्र्यांसोबत बैठका घेतात पण एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायला त्यांच्याकडे वेळ नाही. आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून स्वतः नामानिराळे राहायचे हाच त्यांचा डाव आहे. ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला सुखानं जगू देणार नाही अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांच्यावर केली आहे. gopichand padalkar on msrtc employee strike    

Gopichand Padalkar
'Corona तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात १२ लाख रुग्ण संख्या राहील'

एसटी कर्मचारी पुन्हा संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतांश बस स्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दरम्यान बीड येथे एसटी कर्मचारी हा आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना त्याला सहका-यांनी वाचविले. तात्काळ त्याला डॅाक्टरांकडे नेल्याने त्याचे प्राण वाचले पण परिस्थिती नाजूक आहे असे आमदार पडळकर यांनी नमूद केले. ते म्हणाले आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे पण हे प्रस्थापितांचे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. कोर्टाची दिशाभूल करत आहे. जर यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती तर ३१ जणांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती.

महाविकास आघाडीकडे जराही नैतिकता शिल्लक असेल तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब यांनी राजीनामा द्यावा अथवा घ्यवा असा प्रश्न पडळकरांनी केला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com