सातारा : कोविड- १९ च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा देशातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. सध्या तरी काेराेनाची coronavirus तिसरी लाट महाराष्ट्रात साैम्य असेल असे सांगितले जात असले तरी त्यापार्श्वभुमीवर आराेग्य विभागाने उपाययाेजनेची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात कोविडची तिसरी लाट १२ लाखांपर्यंत रुग्ण वाढू शकतात असा अंदाज केंद्र आणि आरोग्य विभागातील तज्ञांच्या माध्यमातून बांधला जात आहे. maharashtra government has started preparations third wave covid cases may ris upt 12 lakhs
राज्यात गेल्या एका महिन्यात उपचारार्थ कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत ५५.०६ ने घट झाली आहे. मुंबई, पुणे, रायगड, नगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांत राज्यातील काेविड १९ च्या सक्रिय रुग्णांपैकी ८२ टक्के रुग्णांची संख्या आहे तर गडचिरोली, नंदुरबार, भंडारा, वाशीम हे जिल्हे कोविडमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.
राज्यात शनिवारी (ता. सहा) ६६१ कोविड -१९ रुग्ण संख्या नोंदली गेली. एप्रिल २०२२ नंतरची ही सर्वात कमी दैनंदिन संख्या असल्याची नाेंद झालेली आहे.निर्बंधांमध्ये शिथिलता असल्याने महाराष्ट्रात अलीकडेच्या काही दिवसांत रुग्ण संख्येत वाढ झाली नसली तरी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी मास्क, सामाजिक अंतर आणि गर्दी टाळण्याचे आवाहन नुकतेच केले आहे.
“मॉल्स, रेस्टॉरंट्स, बार, हॉटेल्स पुन्हा सुरू होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत पण संसर्ग दर नियंत्रणात राहिला आहे. राज्यात सात दिवसांत काेविड १९ रुग्णांचा दर १.३ टक्के राहिला आहे. दरम्यान दिवाळीनंतर रुग्ण संख्येत संभाव्य वाढ होण्याची शक्यता मंत्री टाेपे यांनी व्यक्त केली आहे. तिस-या लाटेच्या पार्श्वभुमावर कोविड टास्क फोर्सने सावधगिरी बाळगली आहे असेही त्यांनी नमूद केले.
गत महिन्यात (सहा ऑक्टोबर)ला राज्यात ३३ हजार १८१ कोविड- १९ रुग्ण होते तर आजच्या मितीस (सहा नोव्हेंबर) १४ हजार ७१४ इतके रुग्ण आहेत. ही नाेंद दिलासा देणारी आहे. धुळे, लातूर, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि अकोलासह ग्रामीण भागात (महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांत) आता प्रत्येकी ५० पेक्षा कमी कोविड- १९ चे रुग्ण आहेत. गडचिरोली, नंदुरबार, भंडारा आणि वाशीम हे जिल्हे कोविडमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे आराेग्य विभागाने दावा केला आहे.
राज्य टास्क फोर्सने दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर आम्ही आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन करत आहोत असे एन रामास्वामी (आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र) यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. ते म्हणाले "आम्ही अंदाजे १२ लाख रुग्णांचा अंदाज तिसऱ्या लाटेत बांधला आहे. सध्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती नाही. परंतु नागरिकांनी काेविड १९ मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यास उत्तम.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.