Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

Airtel Cheapest Data Recharge Plans: तुम्ही तुमच्या फोनचा डेटा रिचार्ज करण्याचा विचार करत आहात, पण तुम्हाला कमी बजेटमधील रिचार्ज प्लान हवाय का? एअरटेलकडे सर्वात कमी रुपयांमध्ये सर्वोत्तम डेटा प्लान आहेत.
Airtel Cheapest Data Recharge Plans
Airtel Cheapest Data Recharge Plansyandex

मुंबई: जेव्हा अतिरिक्त डेटा प्लान घेण्यासाठी रिचार्ज करायचा विचार करतो तेव्हा लागलीच आपला एक हात पॉकेटकडे जातो. रिकाम्या खिश्याकडे पाहून आपण रिचार्ज करण्याचा विचार सोडून देतो. ग्राहकाची कमी बजेट असतो ही बाब लक्षात घेत एअरटेल कंपनीने स्वस्त डेटा रिचार्ज प्लान आणलेत. जर तुम्ही देखील डेटा रिचार्जच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एक किंवा दोन नव्हे तर ५ स्वस्त रिचार्ज प्लानची ​​माहिती देत आहोत. एअरटेल आपल्या ग्राहकांना १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक डेटा प्लॅन ऑफर करते. तुम्ही १९ रुपयांपासून ९९ रुपयांपर्यंतच्या डेटा प्लान घेऊ शकतात.

एअरटेलचा १९ रुपयांचा रिचार्ज प्लान

एअरटेलने आपल्या ग्राहकांना १९ रुपयांचा रिचार्ज प्लान आणलाय. यात जो प्रत्यक्षात डेटा प्लान आहे. यासोबत तुम्हाला १GB डेटाचा फायदा मिळतो. डेटा संपल्यानंतरही तुम्हाला इंटरनेट वापरायचे असेल, तर तुम्ही ते ५० पैसे प्रति एमबी दराने वापरू शकता. एअरटेलच्या या डेटा पॅकची वैधता १ दिवस आहे.

एअरटेलचा २९ रुपयांचा डेटा प्लान

एअरटेलचा २९ रुपयांचा रिचार्ज प्लानदेखील १ दिवसाच्या वैधतेवाला आहे. परंतु त्यासोबत तुम्हाला अधिक GB चा लाभ मिळतो. म्हणजेच तुम्ही १ दिवसासाठी २GB डेटा वापरू शकता.

एअरटेलचा ४९ रुपयांचा रिचार्ज प्लान

एअरटेलचा ४९ रुपयांचा रिचार्ज प्लान अधिक GB फायद्यांसह येतो. या प्लानमध्ये तुम्ही ६GB डेटा घेऊ शकता. या डेटा पॅकची वैधता देखील फक्त १ दिवसासाठी आहे.

एअरटेल ५८ रुपयांचा रिचार्ज प्लान

एअरटेल कंपनीने एक नवीन डेटा प्लान आणलाय. या डेटा प्लानला कोणत्याच प्रकारची वैधता नाहीये. या प्लानमध्ये तुम्ही ३GB डेटा घेऊ शकता. तर एकदा डेटा मर्यादा गाठली की, तुम्ही ५० पैसे प्रति एमबीच्या शुल्कासह वापरू शकता. एअरटेल थँक्स ॲपद्वारे रिचार्ज केल्यावर तुम्हाला मोफत २GB डेटा कूपन मिळते. अशाप्रकारे तुम्हाला ५८ रुपयांच्या रिचार्जमध्ये एकूण ५GB डेटाचा लाभ मिळतो.

एअरटेल डेटा प्लॅन १०० रुपयांच्या आतील प्लान

एअरटेल कंपनीने दोन डेटा प्लान आणलेत. यातील एका प्लानची किंमत ९८ रुपये आणि दुसऱ्या किंमत ९९ रुपये आहे. दोन्ही योजनांमध्ये भिन्न फायदे समाविष्ट आहेत. ९८ रुपयांच्या डेटा पॅकसह, विद्यमान प्लानपर्यंत ५GB डेटाचा लाभ मिळतो. डेटा संपला तर प्लानसह प्रति एमबी ५० पैसे शुल्क आकारले जाते. याशिवाय तुम्हाला ३० दिवसांसाठी Wynk Music Premium चा लाभदेखील मिळतो. ९९ रुपयांच्या डेटा पॅकमध्ये तुम्हाला दररोज २० GB डेटाची सुविधा मिळते. हा डेटा पॅक २ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये तुम्ही एकूण ४०GB डेटाचा लाभ घेऊ शकता.

Airtel Cheapest Data Recharge Plans
WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; काय आहेत प्रमुख कारणे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com