Raj Thackeray reaction on Thackeray brothers’ failure in BEST polls Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Raj Thackeray : बेस्ट पतपेढीत दारूण पराभव, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

Raj Thackeray reaction on Thackeray brothers’ failure in BEST polls : ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. २१ पैकी एकाही जागेवर विजय मिळाला नाही. हा छोटा विषय आहे. स्थानिक पातळीचा मुद्दा असून इतकी मोठी चर्चा गरजेची नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

Namdeo Kumbhar

  • बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारूण पराभव झाला.

  • या पराभवाबाबत राज ठाकरे म्हणाले, “हा छोटा विषय आहे.”

  • राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पार्किंग आणि टाऊन प्लॅनिंगचा मुद्दा मांडला.

  • पत्रकार परिषदेत त्यांनी परप्रांतीय लोंढा आणि वाहतूक समस्यांवरही भूमिका स्पष्ट केली.

Raj Thackeray on BEST cooperative bank election result : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर पतपेढीची ही निवडणूक लिटमस चाचणी असल्याचे बोलले जात होतं. पण यामध्ये ठाकरे ब्रँडला भोपळाही फोडता आला नाही. ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला २१ पैकी एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय स्थानिक पातळीचा आहे. छोट्या विषयाची इतकी मोठी चर्चा गरजेची नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

मुंबई-पुणे-नाशिकसह मोठ्या शहरातील पार्किंग, टाऊन प्लॅनिंग आणि पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. पार्किंग समस्या, वाहतूक कोंडी, परप्रांतीयांचा लोंढा, कबुतरखान्याचा वाद आणि शहरी पुनर्विकासातील अनियमितता या मुद्द्यांवर राज ठाकरे बोलले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अचानक देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी का घेतली? याबाबातही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. टाऊन प्लॅनिंगसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे टाऊन प्लॅनिंगसंदर्भातील आराखडा दिला. मुख्यमंत्र्यांना का भेटलो होते, याबाबत राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. राजकारणावर बोलणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. पण पत्रकारांनी राज ठाकरे यांना बेस्ट पतपेढी निवडणुकीबाबत प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरेंनी संतापले अन् आपलं मत व्यक्त केले.

पतपेढीतील पराभवावर राज ठाकरे म्हणाले हा विषय मला माहिती नाही. त्यावर पत्रकारांनी त्यांना विषय समजवलं. मराठी माणसाने ठाकरेंना का नाकारले, याबाबत काही विश्लेषण करण्यात आले का? त्यावर राज ठाकरे संतापले अन् म्हणाले हा छोटा विषय आहे.

हो मी वाचलं... काय आहे ते? मला माहितीच नाही हा विषय. बेस्ट पतपेढीच्या स्थानिक निवडणुका आहेत. त्याबाबत मला तेवढं माहिती नाही. हा काही इतका मोठा विषय नाही. या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला २४ तास काहीतरी दाखवायला हवं. याची आग लावा, त्याची आग लावा, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली ? राज ठाकरे म्हणाले वेगळा अर्थ काढू नका...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच भेट का घेतली, यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले याचा वेगळा अर्थ काढू नका. टाऊन प्लॅनिंग संदर्भात होती. यात राजकीय काहीच नव्हते.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केला. शहरात बाहेरून येणारे लोंढे थांबवायला हवेत, अन्यथा भविष्यात आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल, असे ते म्हणाले. त्याशिवाय कबुतरखान्याचा वाद हा राजकीय असल्याचेही ते म्हणाले. आपण कबुतर, हत्ती यामध्येच अडकलो आहोत, आपल्याला मुलभूत गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरातील पार्किंगची समस्या खूप मोठी आहे. त्यावर काम करायला हवं. वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणायला हव्यात, असेही राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : १५ वर्षीय मुलीला गरोदर, प्रस्तूतीनंतर जिवंत अर्भकाला कचऱ्यात फेकलं; कल्याणमध्ये २२ वर्षीय नराधमाला अटक

Pune-Lonavala: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट, कसा आहे प्लान?

मोठी बातमी! मुंबईकरांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार; सरकारकडून महालॉटरी, हक्काचं घर लवकरच मिळणार

Jeans Washing Tips : जीन्स किती दिवसांच्या अंतराने धुवायला हवी? आताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update : शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध मानवी हाडाचा सांगाडा सापडला

SCROLL FOR NEXT