MNS; अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त Saam Tv
मुंबई/पुणे

MNS; अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंचे कोरोना Corona चाचणीचे रिपोर्ट आले आहेत. या रिपोर्टनुसार, राज ठाकरे हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज ठाकरेंची २९ ऑक्टोबरला चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट आल्यावर ते कोरोनामुक्त झाल्याचे समजत आहे. तसेच आनंदाची बातमी म्हणजे राज ठाकरे यांच्या बरोबर त्यांच्या मातोश्री कुंदाताई, बहिण देखील कोरोना मुक्त झाले आहेत.

हे देखील पहा-

राज ठाकरे यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील परकार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. २३ ऑक्टोबर दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी कोरोनाने शिरकाव केला होता. राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या मागोमाग आई आणि बहिणींनाही कोरोनाची लागण झाली होती. सर्वांवर लिलावती हॉस्पिटल Lilavati Hospital मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यात आले आहेत. राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली होती. सौम्य ताप आणि लक्षणे दिसून आल्याने कोविड-19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती.

त्यामध्ये राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणि मोठी बहिण जयवंती ठाकरे- देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आले होते. मार्च महिन्यात राज ठाकरे यांच्या आई आणि बहिण जयवंती ठाकरे- देशपांडे यांनी कोरोनाची लस घेतली होती.तरी देखील शुक्रवारी दुपारी परत एकदा तिघांची कोरोना प्रतिबंधक चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट सायंकाळी आला. या रिपोर्टमध्ये राज ठाकरेंनी कोरोनावर मात केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT