मुंबई : राज्यात Maharashtra वाहन चालकाकरिता महत्त्वाची बातमी आहे. कारण आता विना हेल्मेट helmet दुचाकी चालवणाऱ्यांना तसेच सीटबेल्ट Seatbelt न लावल्यास त्यांना आता १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे. वाहतुकीच्या संदर्भात हे नवे नियम पुढील आठवड्यापासून लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन अधिनियम कायदा २०१९ अंतर्गत सोमवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
हे देखील पहा-
नव्या नियमांनुसार, मध्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर, न्यायालयीन कारवाईवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन मोटर वानह कायद्यानुसार, पहिल्या गुन्ह्याकरिता ६ महिने तुरुंगवास किंवा १० हजार रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. तर दुसऱ्यांदा याच गुन्ह्याकरिता कमाल २ वर्षे तुरुंगवास आणि १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही काही नियमांच्या दंडात कपात करण्याचा निर्णय घेणार आहोत.
फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या सुधारित दंडाची अंमलबजावणीचा निर्णय वाहनचाकांना शिस्त लागावी, तसेच अपघात कमी करण्याकरिता लागू करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फॅन्सी नंबर प्लेटकरिता, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास वाहन चालकांना १ हजार रुपये दंड तर वेगाने बाईक चालविल्यास, परमिट शिवाय वाहन चालविल्यास २ हजार रुपये दंड आकारला जाऊ शकणार आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार की, या सुधारित दंडात्मक संदर्भात अंतिम अधिसूचना सोमवारी येण्याची शक्यता आहे. तेव्हा वास्तविक दंड आणि शिक्षा नेमकी काय असेल याविषयीची माहिती सार्वजनिक केली जाणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम लावण्याचे काम मोठा दंड आकारण्यात येणार आहेत. या बरोबरच राज्यात अपघात कमी करण्याबरोबरच मदत होणार आहे. दरवर्षी राज्यात सरासरी १२ ते १३ हजार मृत्यू हे अपघातामुळे होत असतात. ही आकडेवारी कमी करत मिशन झिरो फॅटॅलिटी करण्याचे परिवहन विभागाचे टार्गेट राहणार आहे. मुंबई मोबॅलिटी फोरमच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक दुचाकीस्वारांना शिस्त लावण्याची गरज आहे आणि हेल्मेट न घालणाऱ्या व ट्रिपल सीट दुचाकीवर फिरणाऱ्यांना, वेगाने गाडी चालवणे आणि लेन कटिंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर अंमलबजावणीची गरजेची आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.