Mns Party workers in kalyan Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : मनसे कार्यकर्त्यांना वाटलं राज ठाकरे आले, मोठ्या उत्साहाने फटाके फोडले; पण ताफा केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा निघाला

MNS Party Workers video : तितक्यात एका पोलीस वाहनांच्या सुरक्षेत वाहनांचा ताफा आला. त्यामुळे लगबगीने मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली. मात्र वाहनांचा ताफा जवळ येताच ते केंद्रीय मंत्री कपिल पाटील निघाले. यामुळे मनसे कार्यकर्त्यांची एकच फजिती झाली.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

MNS Latest News:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी झाडून तयारी केली होती. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भलामोठा हार, फटाके सर्व आणले होते. मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर हजेरी लावली होती. तितक्यात एका पोलीस वाहनांच्या सुरक्षेत वाहनांचा ताफा आला. त्यामुळे लगबगीने मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली. मात्र वाहनांचा ताफा जवळ येताच ते केंद्रीय मंत्री कपिल पाटील निघाले. यामुळे मनसे कार्यकर्त्यांची एकच फजिती झाली. (Latest Marathi News)

नेमका काय घडलं?

आज राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्ते दुर्गाडी येथे थांबले होते. याचवेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाहनांचा ताफा रस्त्यावरून जात असतानाच मनसे कार्यकर्त्यांना वाटले राज ठाकरेच आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील फटाके फोडण्यास सुरुवात केली खरी... मात्र तेथे राज ठाकरे नसून केंद्रीय मंत्री कपिल पाटील असल्याचे कार्यकर्त्यांना समजले आणि एकच हशा पिकला.

इतकेच नव्हे तर आपले लाडके नेते राज ठाकरे यांची वाट बघणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला पाहिला मिळाला. त्यानंतर राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्याकडे फटाके नसल्याने पुन्हा कार्यकर्त्यांनी फटाके आणण्यासाठी धावपळ सुरू केली. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यासमोर राज ठाकरे यांचे 25 फुटाचे बॅनर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून दोन दिवस कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. आज कल्याण पश्चिमेतील स्प्रिंग टाइम हॉटेलमध्ये बैठक घेऊन भिवंडी लोकसभेचा तर उद्या शनिवारी डोंबिवलीत ते कल्याण लोकसभेचा आढावा घेणार आहेत. या दौरादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत मनसैनिकांमध्ये एकच उत्साह दिसून येतोय.

कल्याण डोंबिवली शहरात राज ठाकरे यांचा स्वागतासाठी बॅनर्स होर्डिंग लावण्यात आलेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यासमोर राज ठाकरे यांचा 25 फुटाचा भला मोठा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे . या दोन दिवसांच्या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचाच लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT