raju patil. SaamTvNews
मुंबई/पुणे

पक्ष प्रमुखच "कोत्या" मनाचा असेल तर..; आमदार राजू पाटलांची शिवसेनेवर टीका

"खोट्या केसेसचा दबाव टाकत पक्षप्रवेश केला जातोय"

प्रदीप भणगे

डोंबिवली : मनसेच्या माजी नगरसेविका पूजा पाटील आणि तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्यासह मनसे पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याबाबत आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी कालच ते नगरसेवक पदाधिकरी भेटले, खोट्या केसेच्या धमक्या देत आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी सांगितलं. अशा प्रकारच घाणेरडं राजकारण करत जर कोणी पक्ष वाढवित असेल तर ही दुदैवी बाब आहे. लुटमारी करण्याची त्यांची जुनी सवय आहे. पक्षप्रमुखच "कोत्या" मनाचे आहेत मग त्यांच्या पिल्लाकडून काय अपेक्षा करणार असा सवाल करत मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

हे देखील पाहा :

तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत सांगितले की कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील मात्र नकारात्मक राजकारणावर भर देत प्रतिक्रियावादी बनत प्रत्येक विकासकामाला लक्ष्य करत असल्याचे चित्र दिसते आहे. याच परिस्थितीला कंटाळून गेल्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागत असल्याचे चित्र आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांना भोंग्यावरून पोलिसांनी भाद्वी कलम 149 अंतर्गत नोटीस धाडली होती या नोटीसीचा जबाब देण्यासाठी आमदार राजू पाटील आज डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात आले होते.  मनसेच्या दोन माजी नगरसेवकासह 10 पदाधिकार्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.याबाबत राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी दुसऱ्या पक्षातील लोकांना धमकावून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडले जात असून आम्हाला हे अपेक्षितच असल्यामुळे अशा घटना भविष्यात घडल्या तर आश्चर्य वाटणार नाही. प्रत्येक मनसैनिक हा इथला नगरसेवक,आमदार असल्यामुळे कोण पक्षातून गेल्याने आम्हाला फरक पडणार नसल्याचे ते म्हणाले.

तर घाणेरडे राजकारण करून आपला पक्ष वाढविण्याची वेळ यांच्यावर यावी सारखी दुर्दैवी बाब आहे , विचाराची लढाई विचारांनी लढवली जावी मात्र दुर्दैवाने त्यांना हे सध्या समजवण्यासाठी त्यांच्याबरोबर कोणी नसल्याने त्यांची तत्वे धोरणे घेऊन चालले आहेत. असा आरोप त्यांनी केला .पुढे बोलताना दुस:या पक्षातील कार्यकर्ते नगरसेवक पळविण्याचे आम्हा राज ठाकरे यानी शिकविलेले नाही. मला कोणी ठरवून त्रस देऊ शकत नाही. कोणी मला वैयक्तीक घेऊ नये असा सज्जड इशाराच पाटील यांनी त्यांच्या विरोधकांना दिला आहे. 

दरम्यान, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत सांगितले की कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील मात्र नकारात्मक राजकारणावर भर देत प्रतिक्रियावादी बनत प्रत्येक विकासकामाला लक्ष्य करत असल्याचे चित्र दिसते आहे. याच परिस्थितीला कंटाळून गेल्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागत असल्याचे चित्र आहे. डोंबिवलीची शहरप्रमुख राजेश कदम यांच्या नंतर लागलेली गळती अजूनही सुरू असून त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT