MNS Leaders Has Run Away From Police in Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Video: महिला कॉन्स्टेबलला धक्का देत पोलिसांच्या हातावर धुरींनी दिली तुरी; देशपांडेही पळाले

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक नेते मनसेचे अनेक नेते नॉट रीचेबल होते. अशात आज (बुधवारी) अचानक संदीप देशपांडे, संतोष साळी आणि संतोष धुरी शिवतीर्थावर (Shivteertha) दाखल झाले होते. यानंतर माध्यमांना प्रतिक्रया देत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या धडपडीत एका महिला पोलीस कॉन्स्टेबल मनसे (MNS) नेते संतोष धुरी (Santosh Dhuri) आणि संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना अडवत असताना संतोष धुरी यांनी महिला कॉन्स्टेबलला (Female constable) धक्का दिला, त्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. अशात माध्यमकर्मींच्या गर्दीचा फायदा घेत संदीप देशपांडेंनी यातून पलायन केले. या दोन्ही नेत्यांनी पळ काढल्यानंतर पोलिसांनी इतर उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. (mns leaders santosh dhuri and sandeep deshpande has run away from police opposite raj thackeray's house)

हे देखील पाहा -

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे नॉट रीचेबल झाले होते. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, संतोष धुरी हे सगळे प्रमुख नेते नॉट रीचेबल असून त्यांचे मोबाईल फोन स्विच ऑफ (बंद) येत होते. तर वसंत मोरे चार दिवस तिरुपती बालाजी दर्शनाला गेले आहेत. संदीप देशपांडे कालपासून मंध्यमांच्या समोर येत नव्हते. मात्र आज संदीप देशपांडे, संतोष धुरी शिवतीर्थावर संतोष साळी हे अचानक शिवतीर्थ बंगल्यावर दाखल झाले मात्र त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला आहे. ४ मे नंतर जर मशिदींवरील भोंग्यावर सरकारकडून कारवाई झाली नाही तर आपण मशिंदीसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होत. आज मनसेने दिलेला तो अल्टिमेटमची मुदत संपली असल्याने काही ठिकाणी मनसैनिक (MNS) आक्रमक झाले आहेत. लाऊडस्पीकर्सचा वापर करत मनसेकडून हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं आहे. शिवाय मशिद परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम ची घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

दरम्यान मशिदी समाेर अथवा शहरात हनुमान चालिसा (hanuman chalisa) लावण्यावरुन राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज (बुधवार) मनसेचे (mns) कार्यकर्ते आणि पाेलीस दल (police) यांच्यात खटके उडू लागलेत. साेलापूर (solapur), धुळे (dhule), हिंगाेली (hingoli), पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) येथे पाेलीसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT