MNS VS Shinde Group
MNS VS Shinde Group  saam tv
मुंबई/पुणे

MNS VS Shinde Group : शिंदे गटाचा मनसे फोडण्याचा प्रयत्न; मनसे नेत्याचा गंभीर आरोप

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Eknath shinde News : राज्यात सत्तांतर झाल्यामुळे राज्यातील राजकारण बदललं आहे. शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार सत्तेत विराजमान झालं आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेता उभी फूट पडली आहे. शिंदे गटाला नेत्यांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. याचदरम्यान, शिंदे गटाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप मनसे (MNS) सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे.

आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. शिंदे गट देखील आगामी निवडणुकीत सज्ज झाला आहे. याचदरम्यान, मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी थेट शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे.

मनसेने 'एकला चलो रे' नारा दिल्यावर मनसे फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटात सामील होण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना विविध आमिषे दिले जात आहेत, असा गंभीर आरोप नाईक यांनी केला आहे.

दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी आज, बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय नाईक म्हणाले, ' आमच्या भायखळ्यात मनसे पदाधिकाऱ्यांना घरी जाऊन त्यांना कार्यालयात बोलावून चांगले पद देतो अशाप्रकारे विविध आमिषे दाखवली जात आहेत. सदर बाब कळल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांची किव येते'.

'दुर्दैवाने शिंदे गट एक शत्रू समोर असताना आणखी किती शत्रू करू पाहताहेत? हे त्यांना कळलेलं नाही. त्यांनी लढताना त्यांना किती मित्र हवेत आणि किती शत्रू हवेत याची जाण असायला हवी. मला हे चुकीचं वाटतंय. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इतर नेते त्याला गालबोट लावत आहेत, असा गंभीर आरोप करत संजय नाईक यांनी शिंदे गटांच्या नेत्यांवर टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कल्याणमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

Health Tips : तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर, ICMR च्या अभ्यासातून नवीन माहिती उघड

Sangli News: पाय घसरला, अनर्थ घडला, शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; गावावर शोककळा

Jalgaon Gold-Silver Rate News : सोने-चांदीने पुन्हा उच्चांक गाठला!

SCROLL FOR NEXT