Bacchu Kadu : बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली? स्पष्टीकरण देत म्हणाले...

कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र, याच व्हायरल व्हिडिओवर आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Bacchu kadu
Bacchu kadu Saam Tv

अमर घटारे

Bacchu Kadu News : अमरावतीच्या (Amravati) अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बच्चू कडू यांनी एका कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याचे प्रकरण सध्या चर्चत आले आहेत. बच्चू कडू यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र, याच व्हायरल व्हिडिओवर (Video) आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Bacchu kadu
दिग्विजय सिंह लढणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक?; अन्य नेत्यांच्या नावांचीही होतेय चर्चा

अमरावतीच्या अचलपूर (Achalpur) तालुक्यातल्या गणोजा गावात बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी कामकाजासंदर्भात त्यांचा वादविवाद झाला. या वादातच बच्चू कडू यांनी एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली. ही व्यक्ती प्रहारचा कार्यकर्ता असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ प्रचंड व्हायल झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिले आहे. तसेच कार्यकर्ता सौरभ इंगोले यांनी देखील प्रसारमाध्यमांसमोर आले.

आमदार बच्चू कडू म्हणाले की, 'मी त्या कार्यकर्त्याला मारलं नाही. पण तो व्हिडिओ मोडतोड करून विरोधकांकडून व्हायरल करण्यात आला आहे. बातमीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. तसेच व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले आहे.

'मी फक्त थांब म्हटलं, मारहाण केली नाही. त्या कार्यकर्त्यांसबोत आमचं कौटुंबिक नातं आहे, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. तर सदर व्हायरल व्हिडिओवर कार्यकर्ता सौरभ इंगोले यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. 'मला फक्त थांब म्हटलं, समोरचा व्यक्ती ऐकत नव्हता म्हणू मला बच्चू कडूंनी थांबवलं. मला कानशिलात लगावली नाही, असा दावा कार्यकर्ता सौरभ इंगोले यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com