दिग्विजय सिंह लढणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक?; अन्य नेत्यांच्या नावांचीही होतेय चर्चा

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पक्षातील जेष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) देखील लढण्याची शक्यता आहेत.
Digvijay Singh News
Digvijay Singh Newssaam tv

Congress President Election News : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी पक्षातील अनेक दिग्गजांची नाव पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली आहे. काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजस्थानमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. याचदरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पक्षातील जेष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) देखील लढण्याची शक्यता आहेत. दिग्विजय सिंह लवकरच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी अर्ज दाखल करू शकतात.

Digvijay Singh News
राजस्थानमधील काँग्रेसच्या राजकीय नाराजीनाट्यातून अशोक गेहलोत यांना क्लीन चीट? चर्चांना उधाण

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीच्या शर्यतीत याआधी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांची नावे चर्चेत आहेत. अशोक गेहलोत यांचे नाव पुढे आल्याने राजस्थानमध्ये (Rajasthan) नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अशोक गेहलोत सदर निवडणूक लढतील का ? यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.

दुसरीकडे शशी थरूर हे देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतारणार अशी मोठी शक्यता आहे. तर शशी थरूर ३० सप्टेंबर रोजी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. याचदरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्विजय सिंह यांचेही नाव समोर आले आहे.

Digvijay Singh News
Congress : 'भारत जोडो' यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार; शिवसेनाही पाठिंबा देणार?

दरम्यान, थरूर, गेहलोत यांच्या व्यतिरिक्त अध्यक्षपदाच्या शर्यतीत मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल यांची नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत चर्चेत आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या देखील नावाची भर पडली आहे. दरम्यान, दिग्विजय सिंह यांच्याकडे संघटनात्मक आणि प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. ते मध्य प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाताळला आहे. दिग्विजय सिंह हे गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जातात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com