Congress : 'भारत जोडो' यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार; शिवसेनाही पाठिंबा देणार?

'भारत जोडो' यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेस सहभागी होणार तसेच पाठिंब्यासाठी शिवसेनेसोबत सुद्धा बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Congress Bharat Jodo yatra Mumbai
Congress Bharat Jodo yatra MumbaiSaam Tv

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुढील आठवड्यात ही यात्रा मुंबई येणार आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी (Congress) आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या यात्रेत आता राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Shivsena News Today)

Congress Bharat Jodo yatra Mumbai
Rajasthan Political Crisis: 'कॉंग्रेसमधील वाद' चव्हाट्यावर, सचिन पायलट घेणार सोनिया गांधींची भेट

राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच शेकाप, सीपीआय, सीपीएम आणि जनता दलासह काही स्वयंसेवी संस्थाही ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार असल्याचे मुंबईतील एका कॉंग्रेस नेत्याने सांगितलं आहे. विशेष बाब म्हणजे या यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेकडे प्रस्ताव देण्यात आला असून लवकरच याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

देशात वाढती महागाई, बेरोजगारी, तसेच इतर प्रश्नांवर केंद्र सरकारचं लक्ष केंद्रीत करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरूवात केली आहे. ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत निघालेल्या या यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Congress Rahul Gandhi Bharat Jodo Yatra)

Congress Bharat Jodo yatra Mumbai
Mumbai : एसी लोकल चक्क उघड्या दरवाज्यांसह धावली; अंधेरी ते भाईंदर स्थानकादरम्यानचा प्रकार

दरम्यान, २ ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती असल्याने मुंबईतही कॉंग्रेसच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेस सहभागी होणार तसेच पाठिंब्यासाठी शिवसेनेसोबत सुद्धा बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता, या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यात्रेच्या आयोजनाबाबत नुकतीच एक बैठक मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यात मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार अनेक संस्थांनी यात्रेला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com