Rajasthan Political Crisis: 'कॉंग्रेसमधील वाद' चव्हाट्यावर, सचिन पायलट घेणार सोनिया गांधींची भेट

अशोक गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राजस्थानचा नवा मुख्यमंत्री कोण असणार यावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Sachin Pilot
Sachin PilotSaam Tv
Published On

दिल्ली - काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले आहे. ते आज सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची भेट घेऊ शकतात. रविवारी राजस्थानमध्ये काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकले नाही. राजस्थानमधील बदलाची औपचारिक घोषणा रविवारी गेहलोत यांच्या निवासस्थानी आमदारांच्या बैठकीत होणार होती. मात्र गहलोत यांच्या घरी केवळ 20-25 आमदारच दिसले. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Sachin Pilot
Beed: भगरीतून विषबाधेच्या घटनेनंतर अन्न प्रशासन ॲक्शन मोडवर

सचिन पायलट मंगळवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले. तर दुसरीकडे दिल्लीत परतलेले काँग्रेसचे निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी संध्याकाळी त्यांचा लेखी अहवाल सोनिया गांधींना सादर केला. यामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय शांती धारिवाल, महेश जोशी आणि धर्मेंद्र राठोड यांच्यावर अनुशासन भंग केल्याप्रकरणी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने तीन आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अशोक गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राजस्थानचा नवा मुख्यमंत्री कोण असणार यावर जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज सचिन पायलट हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. गेहलोत समर्थक आमदारांनी सचिन पायलट यांच्या  मुख्यमंत्रीपदाला विरोध केला आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सचिन पायटल यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध करत राजस्थानमध्ये एकाच वेळी 92 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. 92 आमदारांनी  राजीनामा दिल्यानं राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अस्थिर बनले आहे. यावर काँग्रेस हायकमांडने तीन नेत्यांना नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com