Latur : काँग्रेसच्या संचालक मंडळाने 'या' कारखान्यात केला मोठा भ्रष्टाचार; शिवसेनेच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप

माजी चेअरमन दिनकर माने यांनी 40 कोटीच्या कर्जाच्या विषयावर मोठा आक्षेप घेत संचालक मंडळाने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे
latur news
latur newssaam tv

Latur News : लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सर्वात जास्त रिकवरी देणारा श्री संत मारुती महाराज सहकारी साखर कारखाना चर्चेत आला आहे. या साखर कारखान्याची आज सर्वसाधारण सभा वादळी झाली. माजी चेअरमन दिनकर माने यांनी 40 कोटीच्या कर्जाच्या विषयावर मोठा आक्षेप घेत संचालक मंडळाने मोठा भ्रष्टाचार (Corruption) केल्याचा आरोप केला आहे

latur news
Bacchu Kadu : बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली? स्पष्टीकरण देत म्हणाले...

औसाचे शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी श्री संत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे पंधरा वर्षे म्हणून चेअरमनपदी काम केले आहे. त्यावेळी कारखान्यावर 10 कोटी रुपयाचे कर्ज होते. दरम्यान मधल्या काही काळामध्ये सदरील साखर कारखाना बंद होता.

गतवर्षी एकच हंगाम विद्यमान संचालक मंडळाने चालवला. यात विविध कारणावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असून त्याच्यावर चाळीस कोटी कर्ज झाल्याचे आजच्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्पष्ट केले. या अहवालामध्ये मोलयासिसचे उत्पादन हे जास्त दाखवले. पण साखरेचा उतारा हा 10.40 पेक्षाही कमी दाखवल्याने शेतकऱ्यांचे प्रति टनाला दोनशे रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोप दिनकर माने यांनी केला.

latur news
दिग्विजय सिंह लढणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक?; अन्य नेत्यांच्या नावांचीही होतेय चर्चा

चेअरमन पदाचा कार्यकाळ संपत असताना कारखान्यावर दहा कोटी कर्ज होते आणि एक वर्ष हंगाम चालला. त्यानंतर 40 कोटी रुपयांचा बोल कर्जाचा बोजा विद्यमान संचालक मंडळाने वाढविला. आज एकूण कर्ज कारखान्यावरती पन्नास कोटी असल्याचे सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाकडून सांगण्यात आले. यावर माजी आमदार तथा माजी चेअरमन दिनकर माने यांनी विद्यमान काँग्रेस प्रणित संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. यात शेतकऱ्यांची किमान चार कोटींचे नुकसान झाल्याचं म्हटलं आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com