CM Eknath Shinde Meet Raj Thackeray
CM Eknath Shinde Meet Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

राज ठाकरेंचा 'तो' सल्ला ऐकला असता तर शिंदे गटाची गोची झाली नसती; मनसे नेत्याचा खुलासा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे, मुंबई

मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कचं अनोखं नातं आहे. गेली अनेक वर्ष शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक या दिवशी शिवाजी पार्कवर दाखल होतात. मात्र यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत होती. मात्र कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर अखेर शिवसेनेनं 'मैदान' मारलं. या सर्व घडामोडींवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेला सल्ला मानला असता तर अशी वेळ त्यांच्यावर आली नसती, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. (Shivsena Dassura Melava)

मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला परवानगी दिल्याने शिंदे गटाची गोची झाली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा हट्ट करू नका, असा सल्ला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच दिला होता. मात्र तो शिंदे गटाने ऐकला नाही. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्कचं अनोखं नातं असल्याने इतरांनी त्यात पडू नये. त्यामुळे अशा ठिकाणी आपण राजकारण आणू नये, असही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांचा हा सल्ला शिंदे गटाने ऐकला नाही, असं महाजन यांनी म्हटलं.

यंदा दोन दसरा मेळावे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाली आहे. तर बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानात मैदानात शिंदे गटाकडून मोठी तयारी सुरू केली आहे. अशारितीने यावर्षी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पाहायली मिळतील.

शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली असली तरी ठाकरे गटासमोरील अडचणी कायम आहेत. कारण उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत शिंदे गट आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. सोमवारी शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Pravin Wakchaure

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT