VIDEO : आनंद महिंद्रा यांना चिमुकल्याची भुरळ; लहानग्याचा विमानातील व्हिडीओ पाहून केली मोठी मागणी

Anand Mahindra Shared Video of Child: सध्या त्यांचं एक ट्वीट चर्चेत आहे. आता नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.
Anand Mahindra Latest News
Anand Mahindra Latest NewsTwitter/@anandmahindra
Published On

मुंबई, 25 सप्टेंबर : देशातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक Mahindra & Mahindra चे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ (Video) ते शेअर करतात आणि त्यावर कमेंट करतात. अनेकांना त्यांनी आपल्यापरीने मदतही केली आहे. सोशल मीडियावरचा त्यांचा वावर अनेकांना आवडतो म्हणूनच त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. सध्या त्यांचं एक ट्वीट चर्चेत आहे. आता नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे. (Anand Mahindra Latest News)

Anand Mahindra Latest News
Khatron Ke Khiladi 12 Winner: 'हा' स्पर्धक ठरला 'खतरों के खिलाडी 12' चा विजेता? फोटो व्हायरल

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर (Twitter) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक गोंडस बाळ विमानातून खाली उतरत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना महिंद्रा यांनी संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना टॅग करत केलं आहे. व्हिडिओमध्ये हा मुलगा फ्लाइटमधून उतरताना सीटवर बसलेल्या सर्व प्रवाशांना 'हाय' म्हणत आहे. तर दुसरीकडे सर्व प्रवासीही मुलाला उत्तर देत आहेत. लहानग्याच्या याच स्टाईलमुळे व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

पाहा व्हिडिओ -

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, जग अधिकाधिक संघर्षमय होत आहे. रशियाची जमवाजमव संकट वाढवत आहे, मात्र जग कसे असावे याची आठवण कशी करून द्यायची हे मुलांना माहीत आहे. @antonioguterres यांनी या मुलाला शांतता आणि सद्भावनेसाठी UN राजदूत बनवावे.

चिमुकल्याचा हा व्हिडीओ ट्विटरवर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यूजर्सही मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

Edited By - Pravin Wakchaure

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com