Khatron Ke Khiladi 12 Winner: 'हा' स्पर्धक ठरला 'खतरों के खिलाडी 12' चा विजेता? फोटो व्हायरल

ग्रँड फिनालेचा एपिसोड ऑन एअर होण्यापूर्वीच या शोच्या विजेत्याचे नाव सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Khatron Ke Khiladi 12 Winner
Khatron Ke Khiladi 12 WinnerSaam Tv

Khatron Ke Khiladi 12 Winner: आज दिग्दर्शक रोहित शेट्टीचचा हिट रिअ‍ॅलिटी शो खतरों के खिलाडी 12 (Khatron Ke Khiladi 12) चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. या शोला आज त्याचा विजेता मिळणार आहे. यावर्षी कोणता स्पर्धक खतरों के खिलाडी 12ची ट्रॉफी जिंकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण ग्रँड फिनालेचा एपिसोड ऑन एअर होण्यापूर्वीच या शोच्या विजेत्याचे नाव सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

Khatron Ke Khiladi 12 Winner
Hawa Hawai Movie: हवाहवाई सिनेमात 'या' मल्याळम अभिनेत्रीची एन्ट्री; पण मुक्ता बर्वेचा चित्रपटाला रामराम

रुबीना दिलैक, फैजल शेख, जन्नत जुबैर, तुषार कालिया आणि मोहित मलिक हे या सिझनचे टॉप-5 स्पर्धक आहेत. खतरों के खिलाडी 12 ची ट्रॉफी कोणाला मिळणार? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत. रिपोर्ट्सनुसार, तुषार कालिया आणि फैसल शेख खतरों के खिलाडी 12 चे टॉप 2 फायनलिस्ट बनले आहेत. त्याच वेळी, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून कोरिओग्राफर तुषार कालियाने खतरों के खिलाडी 12 च्या विजेत्याचा किताब पटकावला आहे. 

तुषार कालियाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुषारच्या शेजारी उभ्या असलेल्या एका मुलाने कारच्या चावीचे कटआउट घेतलेले दिसत आहे. खतरों के खिलाडी 12 च्या विजेत्याला बक्षिसाच्या रकमेसोबत एक कारही मिळणार हे सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे या व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे तुषार कालिया खतरों के खिलाडी 12 चा विजेता ठरला आहे, अशी अटकळ बांधली जात आहे.

बक्षिसाची रक्कम किती असेल?

खतरों के खिलाडी 12 च्या विजेत्याला 20 ते 30 लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. यासोबतच विजेत्याला एक कारही मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com