घरी बसून फेसबुकवरुन सरकार चालत नाही; शिंदे गटातील आमदाराची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

'जो हिंदू हित पे बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा'
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV

संजय गडदे -

मुंबई: 'घरात एसीमध्ये बसून फेसबुकवरुन सरकार चालत नाही, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते शनिवारी संध्याकाळी कांदिवली पूर्वेकडे रस्त्याच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

'घरात एसीमध्ये बसून फेसबुकवरुन सरकार चालत नाही, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, तुम्ही पहिलं असेल मागील काही वर्षा हिंदूंचे सण कसे साजरे व्हायचे आणि आता हिंदूंचे सण कसे साजरा होत आहेत. गोविंदाच्या वेळी १०० अडचणी असायच्या. एकनाथ शिंदे सरकार (Eknath Shinde Government) हे काम करणारे सरकार आहे.

पाहा व्हिडीओ -

दहीहंडीला पाच थराच्यावर थर लावायचे नाहीत मॅट पाहिजे, अशा अनेक अटी असायच्या पण शिंदे साहेबांनी गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला. कोण पडला जखमी झाला तर त्याला सात लाख रुपये. दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याला तत्काळ दहा लाख रुपये देण्याचे काम शिंदे सरकारने केले असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray
पिकांचे नुकसान जास्त दाखवण्यासाठी विमाकंपन्याकडून शेतकऱ्यांची लूट; दबाव टाकताच ४० हजार केले परत

गणपतीच्या वेळी जास्त बांबू लागले तरी बीएमसी पावती फाडायची, यावेळी सर्व गणपती मंडळांना सूट दिली एकही रुपया गणपती मंडळाकडून घ्यायचा नाही. हे आमचे हिंदूंचे सण आहेत साजरे होऊ द्या, जल्लोष साजरे करा, डीजे पण लावा यावर्षी गणपती उत्सवात १२०० कोटी ची उलाढाल झाली. मी पहिला आमदार आहे ज्याने ९ दिवस रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळयाला परवानगी देण्याची मागणी केली असून 'जो हिंदू हित पे बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा' असंही सुर्वे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com