Mira-Bhayandar MNS Protest Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

MNS Protest: नेत्यांची धरपकड, पोलिसांनी परवानगी नाकारली; मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा निघणार की नाही?

Mira-Bhayandar MNS Protest: मीरा-भाईंदरमध्ये मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. पण या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तसंच मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे आता हा मोर्चा निघणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Priya More

मीरा-भाईंदरमध्ये गुजराती व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मीरा-भाईंदरमध्ये मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. पण हा मोर्चा निघण्यापूर्वीच पोलिसांनी मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. याप्रकरणी त्यांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

या सर्व घडामोडींनंतर आता मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मार्चा निघणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत थेट दडपशाही करणाऱ्या सरकारला इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोर्चा होणार असल्याच त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला. त्यांनी सांगितले की, 'काहीही झालं तरी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच. महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा का काढायचा नाही? मोर्चा निघणार म्हणजे निघणार. सामान्य मराठी माणूस आजच्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. सरकारकडून दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू आहे.आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. हे षडयंत्र चालले आहे. पण भाजपच्या षडयंत्राला बळी पडणार नाही.बिहार निवडणुकांसाठी भाजपचं षडयंत्र चालू आहे.'

मीरा-भाईंदरमध्ये मनसेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसिांनी परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्यानंतर देखील मनसेचा मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं. तसंच मनसेच्या सर्व नेत्यांना कलम १६३ अन्वये नोटस बजावली आहे. पोलिसांनी नोटीस बजावत मनसे नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मीरा-भाईंदरमध्ये एकत्र न जमण्याचे आदेश दिलेत.

दरम्यान, वसई-विरारमधील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पहाटे ३ वाजता पोलिसांनी घरातून उचलले. मीरा- भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई- विरारमधील पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. पालघर लोकसभा अध्यक्ष जयंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रफुल पाटील, वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना वसई, विरार, नालासोपारा पोलिसांनी घरातून उचलून पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले आहे. महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदाबी सुरू असल्याच्या भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matheran Accident: माथेरान घाटातून उतरताना ब्रेक फेल झाल्यानं कार उलटली; ६ पर्यटक अडकले अन्...

Pune Tourism : पाऊस अन् घनदाट जंगल, पुण्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन

Maharashtra Live News Update : साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट; नाशिक जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकाऱ्यावर कारवाई होणार

Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पाऊस कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? VIDEO

Neha Kakkar: नेहा कक्करचा व्हायरल लाबुबू डॉल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT