AMIT THACKERAY ANGRY AT BHAVESH KAVRE OVER VIRAL PROPERTY VIDEO saam tv
मुंबई/पुणे

'संपूर्ण व्हिडीओ पाहिलाय तुला आर्ग्यू करायचं असेल तर'...; भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

Amit Thackeray Slams Bhavesh Kavre : भावेश कावरे यांच्या वादग्रस्त प्रॉपर्टी जाहिरातीच्या व्हिडीओवरून वाद निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे संतापल्याची माहिती समोर आली आहे.

Bharat Jadhav

  • प्रॉपर्टी जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भावेश कावरे चर्चेत

  • व्हिडीओवरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि मनसेकडूनही आक्रमक भूमिका

  • वादाच्या पार्श्वभूमीवर भावेश कावरे यांनी अमित ठाकरेंची भेट घेतली.

दक्षिण मुंबईतील एका घराची जाहिरातीमुळे प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. घराच्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भावेश कावरे याच्यावर टीकेची प्रचंड झोड उठली होती. तर मनेसेनंही त्याला दिसेल तिथं ठोका, असा पवित्रा घेतला.

आता त्या भावेश कावरेनं मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी अमित ठाकरे भावेश कावरे यांच्यावर संतापले होते. जर तुला वाद करायचा असेल तर मी निघून जातो, असं म्हणत अमित ठाकरेंनी सुनावलंय. मुंबईतील ताडदेव परिसरात अलिशान इमारतीमध्ये विक्रीसाठी असलेल्या एका घराची जाहिरात करताना हे घर मांसाहार करणाऱ्यांना मिळणार नाही, असं प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे म्हणाला होता, त्यावरून त्याच्यावर टीका केली जात होती.

भावेश कावरेच्या व्हिडिओमुळे मुंबईत मांसाहार करणाऱ्या मराठी लोकांना घरे नाकारण्याचा मुद्दा पुन्हा तापला होता. त्यावर भावेश कावरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे आता भावेश कावरे हा मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भेटीला आला होता. मात्र, राज ठाकरेंची भेट त्याला न मिळाल्याने तो अमित ठाकरे यांना भेटला. या भेटीत भावेश कावरेने अमित ठाकरेंसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

पण कुठलीही सफाई न देता बिनशर्त माफी मागण्याचा सल्ला अमित ठाकरेंनी दिला. यासह तुला वाद करायचं असेल तर मी निघतो, असे म्हणत अमित ठाकरे भावेश कारवरेवर संतापला होता. ती बिल्डिंग शाकाहारी आहे, हे कोण बोललं? त्यावर नाही ते फक्त फ्लॅटसाठी होतं, असं भावेशने म्हटलं. मात्र त्यावर अमित ठाकरे चिडले, ते फक्त फ्लॅटसाठी होतं, मी संपूर्ण व्हिडीओ पाहिलाय, तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो, अशा शब्दात अमित ठाकरेंनी आपला संपात व्यक्त केला.

तुला या गोष्टी कळल्या पाहिजे. तुझ्या घरच्यांना काय वाटलं असेल. तू उगाच थोड्याशा पैशांसाठी मुंबईच्या लोकांमध्ये तणाव निर्माण केला. सोडून द्या ना पैसे, असेही अमित ठाकरेंनी यावेळी भावेशला सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart disease: जॅम-च्युइंग गम खाताय? मग सावधान! ‘या’ स्वीटनरमुळे हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका?

Maharashtra News Live Update: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन

Apple vs Grapes: सफरचंद की द्राक्षे, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते फळ खावे?

Plane Crash : उड्डाण घेताच विमान कोसळलं, लष्कराच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १४ जणांचा मृत्यू

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! विसर्जन मिरवणुकीत कार घुसली, ४ गणेशभक्तांना धडक दिली अन्...

SCROLL FOR NEXT