पुरग्रस्तांसाठी मनसेची आरोग्य सेवा; डोंबिवली ट्रॅफिक पोलिसांचीही साथ प्रदीप भगणे
मुंबई/पुणे

पूरग्रस्तांसाठी मनसेची आरोग्य सेवा; डोंबिवली ट्रॅफिक पोलिसांचीही साथ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पूरग्रस्तांना आरोग्य सेवा दिली जाणार आहे. यासाठी फिरता दवाखाना डोंबिवलीहून कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आला आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने पूरग्रस्तांना (Flood Victims) आरोग्यसेवा (Health Service) दिली जाणार आहे. यासाठी फिरता दवाखाना (Mobile Clinic) डोंबिवलीहून (Dombivali) कोकणच्या (Kokan) दिशेने रवाना करण्यात आला आहे. यामध्ये नाहर हॉस्पिटलचे डॉक्टरांचे पथक, दोन रुग्णवाहिका, औषधे आणि इतर साहित्य आहेत. तर दुसरीकडे डोंबिवली ट्रॅफिक पोलिसांनी (Dombivali Traffic Police) पुरग्रस्तांसाठी टेम्पो भरून सामान महाड आणि चिपळूणकडे पाठवले आहे. (MNS gives health service to flood victims with Cooperation dombivli traffic police)

हे देखील पहा -

याबाबत मनसे कार्यकर्ते अरुण जांभळे (Arun Jambhale MNS) यांनी सांगितले की, आपण आता जवळपास ९७ प्रकारचे मेडिकेशन जवळ ठेवले आहेत. त्याच सोबत आठ डॉक्टरांची टीम आणि १२ नर्सेस आणि एकूण सपोर्टिंग स्टाफ पकडून २७ जणांची टीम  घेऊन आम्ही चिपळूण आणि खेडला निघालो आहोत. एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट या दिवशी त्या परिसरात आम्ही आरोग्य शिबीर घेणार आहोत आणि नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करणार आहोत. टिटीच्या इंजेक्शनची पूरग्रस्त भागात सर्वाधिक मागणी आहे. पुराच्या परिस्थितीत अनेकांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे या सर्व गोष्टी आम्ही तिकडे पुरवणार आहोत. तसेच या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन आणखी तिथे काय हवं आहे याचा आढावा घेऊन ज्या मेडिकेशन आपण घेतले आहेत, ते आपण तिकडे पुरविणार आहोत.

दिनेश पाटील (Dinesh Patil MNS) यांनी सांगितले की  मनसे आणि नाहर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज खेड आणि चिपळूण परिसरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. मागच्या वेळेस कोल्हापूरला पूर परिस्थिती झाली होती त्यावेळी, आम्ही इथून काही मेडिकेशन पाठवल्या होत्या. मात्र यावेळी कोकणात झालेल्या पूरपरिस्थिती नंतर मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला होता की, आपल्याला तिथे काय करता येईल का? आम्ही तर त्याच हेतूने आम्ही प्रयत्न करतोय जास्तीत जास्त लोकांना उपचार करून बर करणं. आम्ही जर कोणाला काही कमी असेल तर त्यांना देसाई परिसरातून अन्नधान्याचे  देखील वितरण केले आहे.

डोबिवली वाहतुक उपविभाग यांच्याकडूनही चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत

अतिवृष्टी झाल्याने अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे चिपळूण आणि आजूबाजूंच्या गावांवर फार मोठे संकट ओढावले आहे. पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील वाहतुक विभाग ठाणे व सहा. आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली उपशाखचे उमेश गित्ते, राजश्री शिंदे व अंमलदार यांनी स्वच्छेने केलेली मदत साईश गुपच्या राजश्री पवार यांच्या संयुक्त विद्यमाने बाधित कुटुंबियांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी पुरग्रस्त भागातील रहिवाशांना अन्नधान्य पाठवले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar News : मुंबईत भाजप-ठाकरे गट आमनेसामने; दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये कुटाकुटी! पाहा Video

Jharkhand Assembly : काँग्रेसकडून जाती-जातीचं राजकारण; झारखंडमध्येही मोदींनी दिला 'एक है तो सेफ है' चा नारा

Supriya Sule News : सत्तेतल्या लोकांकडून धमक्या दिल्या जाताय; टिंगरेंच्या नोटीसवर सुप्रिया सुळेंची टीका

IND vs SA 2nd T20I: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली! दुसरा सामना किती वाजता सुरू होणार?

Pankaja Munde : बंडखोरी हा राजकारणाचा एक भाग; पंकजा मुंडे यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT