Raj Thackeray Video: Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray Video: खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; मनसे प्रमुखांनी ठाकरे स्टाइलने सोडवली ५ किमीची ट्रॅफिक

Raj Thackeray Khalapur Video: वाहतूकोंडीला आज रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरेंनाही सामोरे जावं लागलं. मात्र, ही समस्या मनसे प्रमुखांनी स्वत: रस्त्यावर उतरत टोलनाक्यावर जाऊन क्षणार्धात सोडवली.

Vishal Gangurde

Raj Thackeray News:

रस्त्यावरील ट्रॅफिकच्या समस्येला सर्वसामान्य जनता रोजच सामोरे जाते. या ट्रॅफिकमुळे वाहनांमधील प्रवासी हतबल होतात. अशाच वाहतूकोंडीला आज रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरेंनाही सामोरे जावं लागलं. मुंबईच्या दिशेने जाताना मनसे प्रमुखांनी स्वत: रस्त्यावर उतरत टोलनाक्यावर जाऊन क्षणार्धात वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवला. (Latest Marathi News)

अन् राज ठाकरे स्वत:च टोलनाक्यावर गेले

रोजच्या ट्रॅफिकमुळे सर्वसामान्य जनता नेहमीच हैराण होते. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर वाहनातील प्रवासी तासंतास खोळंबून जातात.

ट्रॅफिकमध्ये अडकल्यांनंतर वाहतूककोंडी सुटत नाही, तोपर्यंत प्रवाशांना कुठेही जाता येत नाही. याच ट्रॅफिकमधून मनसे प्रमुख राज ठाकरेही सुटले नाही. मात्र, वाहतूककोंडी झाल्यानंतर राज ठाकरे कारमधून बाहेर येत ठाकरे स्टाइलने वाहतूककोंडीची क्षणात सोडवली.

नेमकं काय घडलं?

मनसे प्रमुख राज ठाकरे हे पिंपरी चिंचवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मुंबईच्या दिशेने निघाले होते. मुंबईच्या दिशेने जाताना खालापूर टोलनाक्यावर मोठ्या संख्येने वाहने होती.

या रस्त्यावरील पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. लोकांची गैरसोय पाहून स्वत: राज ठाकरे टोलनाक्यावर गेले. त्यांनी अडकलेल्या रुग्णावाहिकेलाही रस्ता करून दिला. यावेळी राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत टोलवरील अधिकाऱ्यांना दम देऊन वाहतूककोंडीचा प्रश्न अवघ्या काही मिनिटात सोडवला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज ठाकरेंनी केली टोलनाका व्यवस्थापकाची चर्चा

टोलनाक्यावरील वाहतूककोंडी पाहून राज ठाकरे स्वत: टोलनाक्यावर गेले. राज ठाकरे यांनी संबंधित टोलनाका व्यवस्थापकांशी चर्चा केली. यावेळी राज ठाकरेंनी टोलनाक्यावरील वाहतूककोंडीत अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली. राज ठाकरेंनी ठाकरी बाणा दाखवत टोल अधिकाऱ्यांना दम दिल्याचेही दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Rule: भावा,वारंवार चालान येणं चांगलं नव्हं! ड्रायव्हिंग लायसन्स होईल रद्द; जाणून घ्या नवीन नियम

Pune Shocking : पुणे हादरलं! आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं, हिंजवडी आयटी पार्कात खळबळ

Maharashtra Live News Update: भर दिवसा धाडसी चोरी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Ind vs Eng : मँचेस्टरमध्ये भारताचा पराभव कसा टळला? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितला टर्निंग पॉइंट

Crime news: प्रायव्हेट पार्टला इजा अन् गळ्याला...; ५ वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार

SCROLL FOR NEXT