आपल्याला ट्रेन चालवता येत नाही, जे आपल्या राज्यात खुर्च्यांवर बसले त्यांना सरकार पण चालवता येत नाही, अशी मिष्किल टीका आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केली. आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी दिघा गाव रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर टीका करताना त्यांची नक्कल केली. (Latest News)
राज्य सरकारसह मोदी सरकारवरही आदित्य ठाकरेंनी टीका केलीय. हे स्टेशन कधी सुरू होणार हा प्रश्न जसा पडलाय तसाच संपूर्ण देशाला पडलेला प्रश्न म्हणजे अच्छे दिन कब आयेंगे. गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाची वाट पाहतोय, जसे उद्घाटन होत नाहीत तसे जसे अच्छे दिन येत नाहीत, असा टोलाही त्यांनी मारला.
दिघा गाव स्थानकाचे उद्घाटन झालेले नसल्याने ते वाहतुकीसाठी वापरता येत नाहीये. रेल्वे स्थानकाचे उद्घाटन न झाल्यामुळे त्यावरील होणाऱ्या खर्चा बोजा आपल्यालावर पडतोय. तेथील लाईट बिल, सफाई कर्मचाऱ्यांचा खर्च करदात्यांकडून वसूल केला जात असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. दिघा रेल्वे स्टेशनची पाहणी का केली याची उत्तर देताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, मला पाहायचं होतं काय गुपित आहे.
रेल्वे स्टेशन (Railway Station) तयार होऊन ९ महिने झाले तरी उद्घाटन मात्र होत नाही. सेवेत सुरू नसलेल्या रेल्वेस्टेशनवरील बंदोबस्त पाहून आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला (Shinde Govt) जोरदार टोला मारला. येथे काही बंदोबस्ताची गरज नाही. येथे बसून पण उपयोग नाही आहे, कारण ट्रेन आम्हाला कोणालाच चालवता येत नाही. आणि गंमत अशी की सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांना सरकार चालवता येत नाहीये.
सेल्फी बुथवरून टीका
मध्य प्रदेशात माहितीच्या अधिकारातून सेल्फी बूथचा खर्च विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर दिल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्याची बदली मोदी सरकारने केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. माहितीच्या अधिकाऱ्याचे प्रश्न आणि त्याची ताकद कमी करण्याची प्रयत्न केले जात आहेत. परंतु आपल्यावरती बसवण्यात आलेल्या खोके सरकारला हे रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्यास वेळ नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.