Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

आज पुन्हा एकदा राजगर्जना; राज ठाकरेंच्या उत्तरसभेकडे राज्याचं लक्ष

राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे.

Shivani Tichkule

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात (Thane) उत्तरसभा आहे. ही सभा वादळी ठरण्याची चिन्हं आहेत. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे उतरवावेच लागतील असे वक्तव्य केले होते. या भाषणाचे पडसाद अद्याप देखील कायम असून आज उत्तरसभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्व्यांचे लक्ष लागलेले आहे.

हे देखील पहा -

राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे. तब्बल 200 चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांची रॅली ठाणे चेकनाक्यावरुन कार्यक्रमाच्या ठिकाणांपर्यंत काढण्यात येणार आहे. या उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, शरद पवार, एसटी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांची ठाण्यातील उत्तरसभा ही याआधी 9 एप्रिल रोजी होणार होती. तलावपाळी या ठिकाणी सभा घेण्याचा प्रस्ताव मनसेने पोलिसांना दिला होता. पण या ठिकाणी 9 तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ही सभा आज होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT