raj thackeray devendra fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Raj Thackeay vs Devendra Fadnavis : राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलंय... नेमकं राज ठाकरेंनी काय आव्हान दिलंय आणि भाजपने राज ठाकरेंना कसं उत्तर दिलंय? पाहूयात.....

Bharat Mohalkar

हिंदीसक्तीचा जीआर मागे घेतला असला तरी हिंदीसक्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही ठाम आहेत... याच मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत हिंदीसक्तीच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतलाय... तर सरकारला आत्महत्या करायची असेल तर जरुर करावी, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावलाय...

तर हिंदीसक्ती लादल्यास दुकानं नाही तर शाळा बंद करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय... त्यावर भाजपचे मंत्री नितेश राणेंनी राज ठाकरेंनाच आव्हान दिलंय..

तर एका पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंची भूमिका ही भाजपची स्क्रिप्ट आहे का? असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला होता.. त्यावरही भाष्य करत युट्यूबवर टीका करणाऱ्या पत्रकारांनाही राज ठाकरेंनी चांगलंच सुनावलंय....

एकीकडे हिंदीसक्तीच्या निर्णयाला विरोध तर दुसऱ्या बाजूला फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती... मात्र मराठीच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड करणार नाही, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतल्याने आगामी काळात सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय घेतल्यास भाषिक अस्मितेचा मुद्दा जास्तच विस्फोटक होण्याची शक्यता आहे... त्यामुळे आता हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर सरकार एक पाऊल मागे घेणार की भाषेवरुन नवा वाद पेटणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, ३५ जणांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवताना पती विहिरीत पडल्या

Milk For Skincare : अशाप्रकारे करा त्वचेसाठी दुधाचा वापर, त्वचा होईल टवटवीत, चेहरा दिसेल तरूण

सैराट! प्रेमप्रकरणातून दोघे फरार, भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचं मुंडन करत संपवलं; दाजीचाही जीव घेतला

Soldier Death : गुढे येथील जवानाला पश्‍चिम बंगालमध्ये वीरमरण; कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT