रुपाली बडवे
Raj Thackeray News : जेष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे .त्यामुळे शिवसेनेत (Shivsena) दोन गट निर्माण होऊन पक्षाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी दोन पक्ष निर्माण झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंपुढे मोठं संकट उभ ठाकलं आहे. याचदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर मोठं विधान केलं आहे.
'उद्धव ठाकरेंना सहानभुती मिळतेय हा भ्रम आहे, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे.
'आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. 'मला पूर्ण विश्वास आहे, आपण सत्तेत पोहचू. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. तुम्हाला सत्तेत घेऊन जाणार. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत नेणार. मी स्वत: बसणार नाही,असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव ठाकरेंना सहानभुती मिळतेय हा भ्रम आहे, असेही राज ठाकरे बैठकीत म्हणाले.
'आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागतील. आपल्याकडे आता पाच महिने आहेत. तुमचा सकारात्मक असला पाहिजेत. राज्यातील राजकारण खालच्या थराला जात आहे. जे पेरलं जातंय ते तुमच्या डोक्यात जाता कामा नये, असेही राज ठाकरे म्हणाले.
'उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानभुती जातेय हा भ्रम आहे. त्यांना कसली सहानभुती ? या लोकांनी जनतेशी प्रतारणा केली. वातावरण तसं नाही आहे. लाखो लोकांनी हे दसरे मेळावे पाहिले सुद्धा नाही, असेही ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.