निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, गद्दारीला...

अंधेरी येथील काही शिवसैनिक आज शिवाजी पार्कला मशाल घेऊन आले होते.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSaam TV
Published On

निवृत्ती बाबर -

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला काल मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Central Election Commission)

आपल्याला मिळालेलं मशाल हे चिन्ह म्हणजे अन्याय, गद्दारी जाळणारी आहे. या मशालीचं तेज आणि त्याचा धोका सगळं लक्षात घ्या असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. अंधेरी येथील काही शिवसैनिक आज शिवाजी पार्कला मशाल घेऊन आले होते.

तेथून हे शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना आपल्याला मिळालेलं मशाल हे चिन्ह अन्याय, गद्दारी जाळणारं आहे. या मशालीचे महत्व, तेज त्याचा धोखा सगळं लक्षात घ्या असा इशारा त्यांनी शिंदे गटाला यावेळी दिला.

पाहा व्हिडीओ -

निवडणूक आयोगाने काल मशाल हे चिन्ह दिल्यापासून शिवसैनिकांमध्ये चांगलाचं उत्साह संचारला आहे. कालपासून मशाल या चिन्हाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अशातच आता हे चिन्ह म्हणजे गद्दारी जाळणारं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यामुळे तर आता याच मशालीच्या साह्याने आम्ही गद्दारांना निवडणुकांमध्ये धडा शिकवणारं असल्याचं शिवसैनिक म्हणत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com