VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

Congress Leader Balasaheb Thorat : कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेर विधानसभा मतदारसंघातून मोठा धक्का एन निवडणुकीच्या तोंडावर बसला आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावातील बाळासाहेब थोरात यांच्या अनेक समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्यानं बाळासाहेब थोरात यांना हा मोठा धक्का असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच बीगुल वाजल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच संगमनेरमधून पेमगिरी गावातील ग्रामपंचायत सदस्यांसह कॉंग्रेसचे अनेकजण भाजपात गेले आहेत. विखे पाटील यांचे निकटवर्तीय भाजपचे अमोल खताळ यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला आहे. या गावातूनच जयश्री थोरात यांची कॉँग्रेसची जनसंवाद यात्रेची सुरुवात झाली होती. मात्र आता थोरात समर्थकांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने बाळासाहेब थोरात यांना विधानसभेच्या रिंगणात याचा मोठा धक्का बसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com