राज ठाकरेंनी मतदार याद्यांवरून सरकारवर टीका
मुंबईत मतदार याद्यांची मनसेकडून तपासणी सुरू
बोगस नावे वगळून व्होटचोरी रोखण्याचा प्रयत्न
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यावर भर
राहुल गांधींनी व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकलंय. गांधींपाठोपाठ राज ठाकरेंनी मतदार याद्यांमधल्या घोळावरून सरकारवर निशाणा साधलाय. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेतील मतदारयाद्यांची पुनर्तपासणी आता आम्हीच करणार असल्याचं ठाकरे ठणकावलंय. दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार याद्या तपासण्यासाठी ठाकरेंनी कार्यकर्त्यांना नेमक्या काय सूचना दिलेत पाहूयात.
शाखाध्यक्षांकडून वॉर्डानुसार मतदार याद्यांची तपासणी
मतदार याद्या तपासण्यासाठी वॉर्डात 2 कार्यकर्त्यांची नेमणूक
प्रत्येक वॉर्डात 110 जणांची एक टीम
अनंत चतुर्दशीनंतर कामाचा सविस्तर आढावा
एकीकडे मनसे मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून सक्रीय होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र गेल्या 25 वर्षांपासून मतदार याद्यांमध्ये दोष असल्याची कबुली दिलीय.मुख्यंमंत्र्यांच विधान पाहता 25 वर्षांपासून मतदार याद्यांची सर्वसमावेशक पुनर्तपासणी का करण्यात आली नाही? मनसेच्या मतदार याद्यांच्या तपासणीनंतर नेमकी काय समोर य़ेणार.. 2 कोटी लोकसंख्या असणाऱ्या मुंबईसारख्या महानगरात मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचं उघडकीस आल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.