MNS agitation on Maharashtra-Karnataka border dispute
MNS agitation on Maharashtra-Karnataka border dispute ज्ञानेश्वर हिंगोलीकर
मुंबई/पुणे

Pune News: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला, मनसेने पुण्यात कर्नाटकच्या बसला काळं फासलं

Dnyaneshwar Choutmal

Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. अशात सीमावादाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे. (MNS agitation on Maharashtra-Karnataka border dispute)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी पुण्यातील नवले पूल परिसरात आंदोलन केले आहे. कर्नाटक राज्याच्या बसेसला मनसैनिकांनी काळं फासलं आहे. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन हे आंदोलन करण्यात आलं आहे.  (Maharashtra-Karnataka Border Dispute)

बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी मंगळवारी सकाळपासूनच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. काही वेळापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरे बागेवाडीजवळ महाराष्ट्र राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले. वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. यानंतर मनसेही आक्रमक झाली आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर कन्नड संघटनांनी दगडफेक करत तोडफोड केली आहे. यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील नवले पूल परिसरात आंदोलन केले. कर्नाटक राज्याच्या बसेसला मनसैनिकांनी काळं फासलं आहे. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन हे आंदोलन करण्यात आलं आहे.

दरम्यान याबाबत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. शंभूराज देसाई यांनीदेखील या हल्ल्यानंतर निषेध व्यक्त केला असून लवकरच आम्ही ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडणार आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi: कलम ३७०, राममंदिर अन्.. ४०० पार कशासाठी? PM मोदी थेट बोलले; काँग्रेसवर हल्लाबोल

Live Breaking News : तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२.६३ टक्के मतदान

Pakistan Cricket Team: टी-२० वर्ल्डकपआधीच पाकिस्तान संघात फूट? बाबर- इमाद वसीम आपसात भिडले; पाहा Video

Blood Pressure कमी झाल्यावर काय खाणे योग्य ठरते

Jiya Shankar: सौंदर्य तुझं पाहून;'जिया' धडक जाये!!

SCROLL FOR NEXT