Video: शिवरायांच्या पुतळ्याच्या लाईटसाठी मला कपडे विकावे लागतील; आमदार संतोष दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल

BJP MLA Santosh Danve: "पुतळ्याला एलईडी लावायला जर मी पैसे दिले तर, मला माझे कपडे विकायला लागतील" असं वादग्रस्त विधान भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी केलं आहे.
BJP MLA Santosh Danve
BJP MLA Santosh DanveSaam TV
Published On

MLA Santosh Danve Latest News: राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत भाजप नेत्यांकडून अनेक वादग्रस्त वक्तव्ये करण्यात येत आहेत. राज्यपाल कोश्यारी, प्रसाद लाड यांच्यानंतर भाजपच्या आणखी एका आमदाराचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात भाजप आमदार शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. (Controversial Statement On Shivaji Maharaj)

भाजपचे भोकरदन विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांचे चिरंजीव असलेले संतोष रावसाहेब दानवे यांचा एक जूना व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात आमदार संतोष दानवे एका शिवप्रेमीला हटकताना दिसत आहे. "पुतळ्याला एलईडी लावायला जर मी पैसे दिले तर, मला माझे कपडे विकायला लागतील" असं वादग्रस्त विधान भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ जूना असून आता पुन्हा व्हायरल होत आहे. (LIVE Marathi News)

पाहा व्हिडिओ -

भाजप आमदार प्रसाद लाड यांचं शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

भाजप नेते सतत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. नुकतेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांच्या जन्मस्थळावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली असताना, आता त्यात प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. या वक्तव्यावरुन टीका सुरु झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली, तसेच कालच मी माझं वक्तव्य सुधारलं होतं असं देखील ते म्हणाले. (Breaking Marathi News)

BJP MLA Santosh Danve
Maharashtra Politics Blog: ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती शक्य आहे का? ठाकरे गटाकडून का होतोय निर्णयाला विलंब

राज्यापाल कोश्यारी यांंचं शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य

काय म्हणाले राज्यपाल?

आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला महाराष्ट्र बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला अनेक आयकॉन आढळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून महाराष्ट्र राज्यभर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

भाजप खासदार तथा राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचं शिवारायांबाबत वादग्रस्त वक्तव्य

भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हे एका हिंदी वृत्त वाहिनीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर चर्चा सुरू होती. यावेळी भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही विनायक सावरकर यांच्यासोबत केली. सुधांशु त्रिवेदी यांच्या या डिबेटमधील शिवाजी महाराजांवरील विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सुधांशु त्रिवेदी म्हणाले, 'राहुल गांधी म्हणाले की वीर सावरकर यांनी माफी मागितली आहे. मात्र, माफीनाम्यावर बोलायचं झालं तर, त्याकाळी सुटका होण्यासाठी अनेक जण माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगाजेबाला ५ वेळ पत्र लिहून माफी मागितली'.

BJP MLA Santosh Danve
Maharashtra-Karnataka Border Dispute : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला, सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता
१७ डिसेंबरला महाविकास आघाडीचा मोर्चा

दरम्यान महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) येत्या 17 डिसेंबर रोजी राज्य सरकारविरोधात (Maharashtra government) रस्त्यावर उतरणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख (shivsena)आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी ही घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून आणि राज्यपालांकडून महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे असा आरोप विरोधक करत आहेत.

या विरोधातच उद्धव ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिली. राज्यपालांना हटवले जावे अशी मागणी देखील मविआकडून केली जातेय. आज महाविकास आघाडीची बैठक (Mahavikas aghadi meeting) पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ठाकरेंनी या आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com