Mumbai Metro Line 14 X
मुंबई/पुणे

Mumbai Metro Line 14 : मुंबईहून बदलापूर एका तासात गाठता येणार, ३८ किमी लांब मेट्रो लाईन १४ ची मोठी अपडेट समोर

Kanjurmarg to Badlapur Metro Line 14 : कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्गावरील मेट्रो लाईन १४ च्या बांधकामाची अपडेट समोर आली आहे. या मेट्रो लाईनमुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागेल.

Yash Shirke

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने कांजुरमार्ग ते बदलापूर या मार्गावरील प्रस्तावित ३९ किमी मेट्रो लाईन १४ चे काम एका वर्षामध्ये सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पब्लिक प्रायव्हेड पार्टनरशिप मॉडेलवर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा विचार केला जात आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गिकेमुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याचे तब्बल १.५ ते २ तास वाचणार आहेत. दररोज सुमारे ७ ते ८ लाख प्रवाशांना या मार्गाने प्रवास करता येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मॅजेन्टा लाईन १४ या मेट्रो लाईनसाठीचा डेटिल्ड प्रोजेक्ट रिपोर्टचा मसुदा मिलान मेट्रोने सादर केला आहे.

नव्या कॉरिडॉरमध्ये कांजुरमार्ग ते घणसोलीपर्यंत भूमिगत ट्रॅक आणि घणसोली ते बदलापूरपर्यंत एलिव्हेटेड लाईन्ससह हायब्रिड स्ट्रक्चरचा वापर केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. एमएमआरडीएन या प्रकल्पासाठी लवकरच निविदा काढण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे प्रकल्पाचे बांधकाम लवकरच सुरु होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

एमएमआरडीएने पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेड पार्टनरशिप मॉडेलवर मेट्रो प्रकल्प राबवले होते. यातील काही प्रकल्पांमध्ये एमएमआरडीएला वाईट अनुभव आला होता. त्यामुळे कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो लाईन प्रकल्पात पीपीपी मॉडेल स्विकारण्यासंबंधित निर्णय सर्व पैलूंचा सखोल अभ्यास केल्यानंतरच एमएमआरडीएद्वारे घेतला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

नव्या मेट्रोमुळे मुख्य रस्त्यांवरील गर्दी लक्षणीयरित्या कमी होईल. या मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मेट्रोमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल. याशिवाय कांजुरमार्ग ते बदलापूर अशी मार्गिका असल्याने रेल्वे लोकलवरील ताण देखील कमी होईल. या प्रकल्पातील मार्ग पारसिक हिल्स आणि ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्याच्या जवळून जात असल्याने पर्यावरण आणि वन विभागाची मंजुरी घेणे आवश्यक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT