Metro News Saam Tv
मुंबई/पुणे

Metro Ticket App News : रांगेची कटकट संपली! मेट्रो प्रवाशांना १४ अ‍ॅपवरून तिकीट काढता येणार; काय आहे नेमकी सुविधा?

Metro 2A and 7th Ticket App Update News : मेट्रो २A आणि ७ मार्गिकेवरील प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. आता क्यूआर आधारित तिकीट १४ हून अधिक मोबाईल अ‍ॅपवर मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • मेट्रो २A आणि ७ मार्गिकेवरील तिकीट आता १४ पेक्षा अधिक मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध

  • ‘मुंबई वन’ अ‍ॅपला ३ लाखांहून अधिक डाउनलोड

  • One Ticket, RedBus, Yatri Rails यांसारख्या अ‍ॅपवर QR तिकीट सुविधा

  • लवकरच पेटीएम, उबर आणि रॅपिडो वरही मेट्रो तिकीट मिळणार

मेट्रो प्रवाशांना अनेकदा तिकिटांसाठी लाईनमध्ये तात्काळत उभे राहावं लागत. काही जण पासद्वारे प्रवास करतात. मात्र आता दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. या मार्गिकेवरील प्रवासासाठीचे तिकीट आता १४ हून अधिक मोबाईल कंझ्युमर अ‍ॅपवरून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एमएमआरडीएच्या मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीएकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यातही प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज भासू नये यासाठी ई तिकिटाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आता तिकिटांशी संबंधित अन्यही सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

याचाच भाग म्हणून एमएमआरडीएकडून ८ आॅक्टोबरला भारतातील पहिल्या एकात्मिक तिकिट अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. मुंबई वन नावाच्या या अ‍ॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ३ लाखांहून अधिक प्रवाशांनी मुंबई वन अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. आता मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवरील क्यू आर आधारित तिकिट १४ पेक्षा अधिक अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

ही सुविधा वन तिकीट, रेड बस, रेड रेल, यात्री रेल्वेज, इजी माय ट्रीप, हायवे डिलाईट सह अन्य अ‍ॅपचा यात समावेश आहे. तर लवकरच पे टाईम, उबर आणि रॅपिडो यावरही तिकिट उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सुविधा येत्या काळात वाहतूक सेवेत दाखल होणाऱ्या मेट्रो २ ब (मंडाले, मानखुर्द ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ९ (दहिसर ते भाईंदर) मार्गिकेवरील प्रवाशांनाही या सुविधेचा वापर करता येणार असल्याचेही एमएमआरडीने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी नगरपरिषदमध्ये भाजपाचे उपनगराध्यक्षांना इंजिनियरकडून शिवीगाळ आणि धमकी

Success Story: ९ वर्षांची मेहनत, ८ वेळा अपयश, लग्नासाठी दबाव; कठीण परिस्थितीवर मात करत केली MPPSC क्रॅक; DSP मयंका चौरसिया यांचा प्रवास

Todays Horoscope: आज तुम्ही लपवून ठेवलेल्या गोष्टी सर्वांसमोर येऊ शकतात, जाणून घ्या राशीभविष्य

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

SCROLL FOR NEXT