Mlc Election Result 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: मोठी बातमी! मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब विजयी

साम टिव्ही ब्युरो

एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब हे विजयी झाले आहेत. विधानसभेच्या चारही जागांचे कल हाती आले असून मुंबईतून अनिल परब यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे.

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतमोजणी सुरु आहे. शिक्षक मतदारसंघात भाजप, ठाकरे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी, सुभाष मोरे, शिंदे गट यांचे उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई पदवीधरमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे सेना असा थेट सामना होता. भाजप येथून किरण शेलार यांना संधी दिली होती. ज्यांचा अनिल परब यांनी जवळपास 25 हजार मतांनी पराभव केला. अनिल परब यांचं विजयानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या चार जागांमधील एक जागेवर ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. तर दोन जागांवर ठाकरे गट आघाडीवर आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आघाडीवर आहेत. या दोन जागांचे निकाल काहीच वेळात जायीर होणार आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप सज्ज

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजप नेत्यांना पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपने विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सादर भाऊ खोत यांच्या यांना संधी दिली आहे. यातच आता महायुतीच्या पक्षांकडून म्हणजेच शिंदे गटाकडून 2 आणि अजित पवार गटाकडून 2 उमेदवार विधान परिषद निवडणुकीत उतरवले जाणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून 2 उमेदवार उतरवले जाणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT